Download App

Rajat Patidar : पाच वर्ष लहान क्रिकेटपटूच्या नेतृत्वाखाली कोहली करणार ‘विराट’ खेळी

  • Written By: Last Updated:

Rajat Patidar Named RCB captain for IPL 2025 : 21 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या नव्या हंगामात RCB च्या संघाची कमान विराट कोहलीऐवजी (Virat Kohli) रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये कोहली त्याच्यापेक्षा वयाने पाच वर्ष लहान असणाऱ्या रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखाली ‘विराट’ खेळी करताना चाहत्यांना दिसून येणार आहे.

Virat Kohli ने इतिहास रचला, सचिन तेंडुलकरला मागे टाकत केला ‘हा’ खास विक्रम

कोण आहे रजत पाटीदार?

गेल्या वर्षीच्या मेगा लिलावापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये रजत पाटीदारचाही समावेश होता. रजतला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (T20) आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये (ODI) मध्य प्रदेशचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. 31 वर्षीय रजत पाटीदारने 2022 मध्ये फ्रँचायझीसोबत करार केला होता. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, गेल्यावर्षी झालेल्या या सामन्यात मुंबईकडून पाच विकेट्सने मध्य प्रदेश संघाचा पराभव झाला होता.

विराटने 8 वर्षे संभाळली RCB ची कमांड

आयपीएलच्या नव्या सिझनसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कर्णधारपदी विराट कोहलीची कर्णधारपदी निवड होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. पण विराट ऐवजी रजत पाटीदारकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. आतापर्यंतच्या पार पडलेल्या आयपीएलच्या सीझनमध्ये कोहलीने 2013 ते 2021 पर्यंत आरसीबी संघाच्या कर्णधारपदाची कमान संभाळली आहे. परंतु, त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघाला जेतेपद जिंकता आले नाही.

Raghuram Rajan : युवा भारतीयांची मानसिकता विराट कोहलीसारखी; नक्की काय म्हणाले रघुराम राजन

तुला आमचा सर्व पाठिंबा असेल – कोहली

आरसीबी संघाच्या कर्णधारपदी रजत पाटीदारची निवड झाल्यानंतर त्याच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव केला जात असून, आरसीबीकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये कोहलीनेदेखील रजतचे अभिनंदन केले आहे. या फ्रँचायझीमध्ये तू ज्या पद्धतीने प्रगती आणि कामगिरी केली आहेस, त्यामुळे तू सर्व आरसीबी चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहेस. माझ्यासह इतर सदस्य तुझ्या पाठीशी आहेत. या नव्या भूमिकेसाठी तुला आमचा सर्व पाठिंबा असेल.” असे कोहलीने म्हटले आहे.

follow us