Jammu And Kashmir Beat Mumbai : भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज फलंदाजांचा भरणा असलेल्या मुंबई संघाला (Mumbai) रणजी ट्रॉफीच्या ( Ranji Trophy) साखळी सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. कोणतेही नावाजलेले खेळाडू संघात नसलेल्या जम्मू-काश्मीरने (Jammu And Kashmir) मुंबईचा तब्बल पाच विकेट्सने धुव्वा उडविला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, शार्दुल ठाकूर असे टॉपचे खेळाडू संघात असताना व 42 वेळा रणजी विजेत्या मुंबईवर ही नामुष्की ओढवली आहे. शार्दुल ठाकूर याने दोन्ही डावात चांगला खेळ करून मुंबईची लाज राखली. इतर फलंदाज दोन्ही डावात खास काही करू शकले नाहीत. मुंबईतच हा सामना झाला.
Budget 2025 : अर्थसंकल्पाला अंतिम टप्प्यात, अर्थमंत्री सीतारामन यांनी हलवा समारंभाला लावली हजेरी
दोन्ही डावात घसरगुंडी
मुंबईचे कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून फलंदाजीला निर्णय घेतला. पहिल्या डावात मुंबई 120 धावांवर बाद झाली. तर जम्मू काश्मीर संघ 206 धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात मुंबईने 290 धावांपर्यंत मजल मारली होती. टॉपचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर शार्दुल ठाकूरने शतक झळकवत मुंबईचा डाव सावरला होता. जम्मू काश्मीरला विजयासाठी 205 धावांची आवश्यकता होती. हे लक्ष्य जम्मू काश्मीरने 49 ओव्हर्समध्ये पाच विकेट्सच्या बदल्यात गाठले आहे. रोहित शर्मा दोन्ही डावात अपयशी ठरला असून, तो पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात 28 धावा करू शकला. तर यशस्वी जैस्वाल दोन्ही डावात मिळून तीस धावांवर बाद झाला. तर श्रेयस अय्यर व कर्णधार अजिंक्य रहाणे हे दोन्ही डावात 28-28 धावा करू शकल्या. तर मधल्या फळीतील शिवम डुबे दोन्ही डावात खातेही उघडू शकला नाही. मुंबईचा डाव सांभाळला तो शार्दुल ठाकूरने. त्याने पहिल्या डावात 57 चेंडूत 51 धावा काढल्या. दुसऱ्या डावात शार्दुल जबरदस्त खेळला. त्याने 135 चेंडूत 119 धावा केल्यात. तर दुसऱ्या डावात तनुश कोटियनने 62 धावा केल्या.
⚠️ historic win ⚠️🚨 Jammu & Kashmir beat mumbai in ranji trophy match 🏆#ranjitrophy2025 #RohitSharma𓃵 #AjinkyaRahanepic.twitter.com/C4oYyQYP7a
— varun kumar (@VarunkrVarun) January 25, 2025
पहिल्या डावाची आघाडी ठरली निर्णायक
जम्मू काश्मीरला पहिल्या डावात 86 धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात शुभम खजूरिया 45, यावर हसन 24, विवरांत शर्माने 38, अब्दुल समदने 24, कर्णधार पारस डोगराने 5 धावा केल्या. त्यात आबिद मुश्ताक (32 धावा) आणि कन्हैय्या वधावन (19 धावा) या दोघांनी सहाव्या विकेट्ससाठी अर्धशतकाची भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिले. जम्मू-काश्मीरच्या विजयात गोलंदाज युधवीरसिंगचे महत्त्वाचे योगदान राहिले. त्याने मुंबईचे सात फलंदाज बाद केले.