Nirmala Sitharam Participates In Halwa Ceremony : केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी’हलवा’ समारंभात भाग घेतला.
सीतारामन यांच्याशिवाय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि वित्त सचिव तुहीन कांता पांडे, आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ आणि इतर वरिष्ठ अधिकारी या समारंभाला उपस्थित होते.
मागील चार पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प आणि एक अंतरिम प्रमाणेच आगामी बजेट देखील पूर्णपणे पेपरलेस असेल.
सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी 2025-26 साठी त्यांचा सलग आठवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जीडीपी वाढीचा दर या आर्थिक वर्षात 6.4 टक्क्यांवर आला आहे, तो मागील आर्थिक वर्षातील 8.2 टक्क्यांवरून खाली आलाय.
दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी पारंपारिक गोड डिश हलवा मोठ्या कढईत तयार केला जातो. अर्थमंत्र्यांकडून विधीपूर्वक हलवा केला जातो.
दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी पारंपारिक गोड डिश हलवा मोठ्या कढईत तयार केला जातो. अर्थमंत्र्यांकडून विधीपूर्वक हलवा केला जातो.
समारंभाच्या सांस्कृतिक महत्त्वाव्यतिरिक्त, ते अर्थ मंत्रालयाच्या बजेट ‘लॉक-इन’ कालावधीच्या प्रारंभाचे प्रतीक आहे.