Download App

गांगुली खेळणार राजकीय इनिंग? ममता दीदींनी दिली मोठी जबाबदारी

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. त्यांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का आहे, कारण गांगुलीला पक्षात घेण्यासाठी भाजप (BJP) अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. अनेक बैठका आणि चर्चा झाल्या परंतु सत्यात असे काहीच घडले नाही.

काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुलीला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करणे महत्त्वाचे आहे. गांगुलीला राजकारणात आणण्यासाठी तृणमूल काँग्रेसही (Trinamool Congress) अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. मात्र गांगुलीने स्वत:हून अशी कधीही इच्छा दाखवली नाही. परंतु त्याच्या सततच्या राजकीय सक्रियतेने नक्कीच अनेक शक्यताना जन्म दिला आहे. ब्रँड अॅम्बेसेडर बनणेही याच शक्यतामध्ये गणले जात आहे.

पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना पदोन्नती; नाशिकमध्ये मिळाली मोठी जबाबदारी

बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की सौरव गांगुली तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी आणि नाही म्हणू नये अशी माझी इच्छा आहे. सध्या गांगुलीने ही जबाबदारी स्वीकारली आहे, मात्र राजकीय तज्ज्ञांनी याचा राजकीय अर्थ काढण्यास सुरुवात केली आहे.

LetsUpp Special : नगर, नाशिकविरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष काय? तोडगा कसा निघेल ?

रिलायन्स 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
कोलकाता येथे सुरू असलेल्या 7 व्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये मुकेश अंबानी म्हणाले, ‘रिलायन्स बंगालच्या विकासात कोणतीही कसर सोडणार नाही. रिलायन्सने बंगालमध्ये आतापर्यंत सुमारे 45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पुढील तीन वर्षांत आम्ही 20 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहोत.

Tags

follow us