Download App

Sri Lanka vs India : सूर्यकुमार यादव टी-20 संघाचा कर्णधार, गिलला उपकर्णधाराची लॉटरी; श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी संघ घोषित

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये 'मॅच विनिंग' झेल घेणाऱ्या सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) याच्या खाद्यावर टी-20 चा कर्णधारपदाची जबाबदारी.

  • Written By: Last Updated:

Sri Lanka vs India: श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) वनडे आणि टी-20 मालिकेसाठी निवड समितीने भारत ( India) संघाची घोषणा केली आहे.. टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ‘मॅच विनिंग’ झेल घेणाऱ्या <strongसूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) याच्या खाद्यावर टी-20 चा कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. रोहित शर्मा याच्या गैरहजेरीमध्ये हार्दिक पंड्यावर कर्णधारपदाची जबाबदारी येत होती. परंतु निवड समितीने सूर्यकुमार यादवलवर विश्वास टाकला आहे. तर शुभमन गिल हा उपकर्णधार असणार आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्याचा प्रयत्न…; जयंत पाटलांची बोचरी टीका

भारतीय संघाचा श्रीलंका दौऱ्या 27 जुलै रोजी सुरू होणार होणार आहे. टी-20 सामने खेळल्यानंतर 2 ऑगस्टपासून वनडे मालिकेची सुरूवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना वनडे संघात स्थान मिळाले आहे. तर हार्षिक राणा आणि रियान पराग या दोघांची वनडे संघात स्थान मिळाले आहे. रियान हा टी 20 संघात खेळला आहे. तर हर्षिक याचे आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण आहे.

हार्दिक पंड्याकेवळ टी-20 संघात
हार्दिक पंड्याला वनडे टीममध्ये स्थान मिळालेले नाही. त्याची टी-20 संघात वर्णी लागली आहे. त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात येईल, असे बोलले जात होते. परंतु त्याला उपकर्णधारपदही मिळालेले नाही.


वनडेसाठी संघ-
रोहित शर्मा (कप्तान), शुभमन गिल (उपकप्तान), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वाशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

टी-20 संघ
: सूर्यकुमार यादव (कप्तान), शुभमन गिल (उपकप्तान), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा, पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी…

follow us