Download App

नामिबियाचा पराभव करत इंग्लंडचं कमबॅक; सुपर 8 चं गणित ऑस्ट्रेलियाच्या हाती

विश्वचषक स्पर्धेतील 34 व्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाचा पराभव करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.

T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषकात आता लवकरच सुपर 8 फेरीतील सामन्यांना (England vs Namibia) सुरुवात होणार आहे. त्याआधीच्या साखळी (T20 World Cup 2024) सामन्यांत मात्र मोठे उलटफेर झाले आहेत. अजूनही काही संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील एक संघ म्हणजे इंग्लंड. या संघाला अद्याप सुपर 8 मध्ये प्रवेश मिळालेला नाही. मात्र काल स्पर्धेतील 34 व्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाचा पराभव करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडने 41 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर इंग्लंडने आता स्कॉटलंडलाही मागे टाकले आहे.

पावसाने केला खेळ! अमेरिकेची सुपर 8 मध्ये धडक; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

नाणेफेक जिंकून नामिबियाचा कर्णधार गेरार्ड इरास्मसने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामना सुरू असतानाच पाऊस आला. त्यामुळे हा सामना 11 ओव्हर्सचा करण्यात आला. सामना सुरू झाल्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे एक ओव्हर कमी करुन सामना 10 ओव्हर्सचा करण्यात आला. इंग्लंडच्या फलंदाजांनी नामिबियाची गोलंदाजी फोडून काढली. दहा ओव्हर्समध्येच 122 धावा केल्या. यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार नामिबियाला 126 धावांचे आव्हान मिळाले.

आव्हान मोठे असल्याने आक्रमक फलंदाजी करण्याशिवाय दुसरा पर्याय नामिबियाकडे नव्हता. परंतु, नामिबियाचे फलंदाज हे लक्ष्य गाठू शकले नाहीत. दहा ओव्हर्समध्ये त्यांना 84 धावाच करता आल्या. या पराभवानंतर नामिबियाचा संघ स्पर्धेतून बाहरे पडला आहे. तर इंग्लंडचं गणित जर तर वर अवलंबून आहे. आज ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यात सामना आहे. या सामन्यात जर ऑस्ट्रेलिया जिंकला तरच इंग्लंडला सुपर 8 मध्ये प्रवेश मिळेल. त्यामुळे या सामन्याला महत्व प्राप्त झाले आहे.

भारताला धक्का देत इंग्लंडच्या माजी कर्णधाराने T20 World Cup 2024 च्या उपांत्य फेरीसाठी निवडले ‘हे’ संघ

USA इन, पाकिस्तान आऊट

दरम्यान, हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आला. अमेरिकेचे पाच अंक झाले. या वाढलेल्या अंकंसह अमेरिकेने सुपर 8 फेरीत प्रवेश केला. या सामन्यात आयर्लंडने अमेरिकेचा पराभव करावा असे पाकिस्तानला वाटत होते. कारण या सामन्यात जर अमेरिकेचा पराभव झाला असता तर सुपर 8 फेरीत पोहोचण्याची पाकिस्तानची शक्यता कायम राहिली असती. परंतु सामना रद्द झाल्याने पाकिस्तानची वर्ल्डकपमधून सुट्टी झाली आहे. आता पुढील सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडचा पराभव केला तरी पाकिस्तान सुपर 8 फेरीत प्रवेश करू शकणार नाही.

follow us