Download App

… म्हणून रिंकू सिंग आणि केएल राहुलची संघाच्या बाहेर, आगरकरने सांगितले खरं कारण

T20 World Cup 2024: 30 एप्रिल रोजी बीसीसीआयचे निवड समितीने आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. निवड समितीने अनेकांना

T20 World Cup 2024 :  30 एप्रिल रोजी बीसीसीआयचे (BCCI) निवड समितीने आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा केली होती. निवड समितीने अनेकांना धक्का देत केएल राहुलला (K.L. Rahul) संघातून बाहेरचा रास्ता दाखवला तर रिंकू सिंगला (Rinku Singh) राखीवमध्ये स्थान देण्यात आले. यानंतर सोशल मीडियावर संघ निवडीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.

आज (2 मे) मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agkarkar) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. याच बरोबर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी केएल राहुल आणि रिंकू सिंग यांची निवड संघात का ? करण्यात आली नाही याचा देखील खुलासा त्यांनी केला आहे.

मुंबईत आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये रिंकू सिंग आणि केएल राहुल यांची निवड का ? झाली नाही असा प्रश्न मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांना विचारण्यात आला होता यावर उत्तर देत आगरकर म्हणाले, आम्हाला मधल्या फळीत एका खेळाडूची गरज होती. सध्या केएल राहुल सलामीला फलंदाजी करत आहे तर दुसरीकडे मधल्या फळीत संजू चांगली कामगिरी करत आहे आणि ऋषभ पंतही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. यामुळे कोणता खेळाडू चांगला आहे आणि कोणता खेळाडू चांगला नाही हे प्रश्न नाही. संजू आणि ऋषभ पंत यांनी मधल्या फळीत जास्त वेळ फलंदाजी करत असल्याने त्यांना संधी देण्यात आली आहे.

मंडलिकसाठी फडणवीस मैदानात, चंदगडकरांना दिला मोठा शब्द

तर रिंकू सिंगबद्दल बोलताना अजित आगरकर म्हणाले, रिंकू सिंगने काहीही चुकीचे केलेले नाही. आमच्यासाठी त्याला बाहेर ठेवणे हा सर्वात कठीण निर्णय होता. मात्र टी-20 विश्वचषकासाठी रोहितला संघात काही रिस्ट स्पिनर्स हवे होते.यामुळे अक्षर, जो अष्टपैलू फलंदाज आहे, तो उपयुक्त ठरेल असे आम्हाला वाटले. यामुळे आम्ही रिंकू सिंगला राखीवमध्ये स्थान दिला आहे.

follow us

वेब स्टोरीज