T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी भारत- पाकिस्तान लढणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

T20 World Cup 2026 Schedule : टी-20 विश्वचषक 2026 साठी आयसीसीने आज वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारी 2026 पासून सुरु होणार

T20 World Cup 2026 Schedule

T20 World Cup 2026 Schedule

T20 World Cup 2026 Schedule : टी-20 विश्वचषक 2026 साठी आयसीसीने आज वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारी 2026 पासून सुरु होणार असून या स्पर्धेचा आयोजन भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना 8 मार्च रोजी होणार आहे. तर भारत आणि श्रीलंकेतील 8 मैदानावर ही स्पर्धा होणार आहे.

तर दुसरीकडे पुन्हा एकदा चाहत्यांना टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहायला मिळणार आहे. 15 मार्च रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना होणार आहे. या स्पर्धेसाठी भारत अ गटात असून ग्रुपमध्ये पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्सशी भिडणार आहे. भारतीय संघ 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत अमेरिकेशी आणि 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीत नामिबियाशी भिडणार आहे. तर पाकिस्तानशी 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो आणि 18 फेब्रुवारी मुंबईत नेदरलँड्सशी सामना होणार आहे.

 टी-20 2026 विश्वचषकासाठी ग्रुप

ग्रुप अ – भारत, पाकिस्तान, नेदरलँड्स, नामिबिया, अमेरिका

ग्रुप ब – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, ओमान, झिम्बाब्वे

ग्रुप क – इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली

ग्रुप ड – दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, कॅनडा, युएई

  विश्वचषकाचे सामने

भारतात मुंबई (वानखेडे स्टेडियम), कोलकाता (ईडन गार्डन्स), चेन्नई (एमए चिदंबरम स्टेडियम), दिल्ली (अरुण जेटली स्टेडियम) आणि अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम) येथे होतील. दरम्यान, श्रीलंकेत, कोलंबो (आर. प्रेमदासा स्टेडियम), कोलंबो (सिंहली स्पोर्ट्स क्लब) आणि कॅंडी (पल्लीकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम) येथे सामने होतील.

पाहा संपूर्ण वेळापत्रक

अहिल्यानगर सिव्हिलमध्ये एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला सुरूवात; खासदार नीलेश लंकेंच्या पाठपुराव्याला मोठे यश

Exit mobile version