Download App

World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच बांग्लादेशकडून लंकेची शिकार ! तीन विकेट्सने केला पराभव

  • Written By: Last Updated:

SL vs BAN : वर्ल्डकपच्या (World Cup 2023) दिल्लीतील मॅचमध्ये बांग्लादेशने (Bangladesh) श्रीलंकेचा (Srilanka) तीन विकेट्सने पराभव केला. लंकेच्या गोलंदाजांनी बांग्लादेशचे फलंदाज बाद करीत मॅट शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. परंतु बांग्लादेशला ऑलआऊट करता आले नाही. चरिथ असलंकाच्या शतकीय खेळीच्या जोरावर लंकेने 279 धावसंख्या उभारली होती. बांग्लादेशने 42 व्या ओव्हरमध्ये सात विकेट्स गमवत 282 धावा करत ही मॅच जिंकली. वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशने केवळ दोनच मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे हा संघ सेमीफायनलच्या शर्यतीत बाहेर झाला आहे. वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशने प्रथमच लंकेला पराभूत केले आहे.

Angelo Mathews : एकही बॉल न खेळता मॅथ्यूजला परत पाठवणारा ‘टाईम आऊट’चा नियम काय आहे?

लंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना नजमुल शांतोने 90 धावांची शानदार खेळी केली. त्याने 101 चेंडू खेळत 12 चौकार मारले. तर कर्णधार शाकिब अल हसनने 65 चेंडूत 82 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने आपल्या खेळीत बारा चौकार आणि दोन षटकार मारले. लंकेकडून दिलशान मदुशंकाने तीन विकेट झटकाविल्या. तर महीष तीक्ष्णा आणि अँजलो मॅथ्यूज यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या आहेत.

लंकेने प्रथम फलंदाजी करत चरिथ असलंकाच्या शतकीय खेळीच्या जोरावर 279 धावा केल्या होत्या. लंकेच्या तरिथ असलंकाने 108 धावा केल्या. तर पथुम निसांका आणि सदीरा समरविक्रमा यांनी प्रत्येकी 41 धावा काढल्या. बांग्लादेशच्या तंजिम हसन शाकिबने तीन विकेट घेतल्या आहेत. तर शाकिब हसन आणि शेरिफुल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आहे.

बांग्लादेशने हा सामना जिंकला असला तरी त्याचा फारसा काही उपयोग नाही. कारण बांग्लादेश यापूर्वीच सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर झाली आहे. या वर्ल्डकपमध्ये बांग्लादेश आठ मॅचमध्ये दोनच मॅच जिंकू शकला आहे.

श्रीलंका सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर

बांग्लादेश, इंग्लंडनंतर आता श्रीलंकाही वर्ल्डकपच्या सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाने सेमीफायनलचे तिकीट मिळविले आहे. आता पाच संघ सेमीफायनलच्या दोन जागांसाठी लढणार आहे. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाची दावेदारी पक्की मानली जात आहे. तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेदरलँड संघही शर्यतीत आहे. परंतु जर-तर परिस्थितीवर या संघाचे नशिब आहे.

follow us