India vs Bangladesh : पुण्यात इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्याचं टीम इंडियासमोर आव्हान

  • Written By: Published:
India vs Bangladesh : पुण्यात इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्याचं टीम इंडियासमोर आव्हान

India vs Bangladesh ICC world Cup 2023 : चेन्नई, नवी दिल्ली आणि अहमदाबाद येथील पार पडलेल्या सामन्यांमध्ये विजयी होत भारतीय संघ पुण्यात (Pune MCA Stadium) दाखल झाला आहे. आज (दि.19) पुण्यातील एमसीए मैदानावर भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्या लढत होणार आहे. विश्वचषकातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तान, आफगाणिस्तान आणि बलाढ्य मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने भारतीय संघाचं मनोबल वाढलं आहे. मात्र, असे असतानाही भारतीय संघाला पुण्याच्या मैदानावर गेल्या दोन सामन्यांमध्ये झालेल्या इतिहासाची म्हणजेच उलटफेराची पुनरावृत्ती टाळण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

World Cup 2023 : …म्हणून भारत-बांग्लादेश सामन्यात नाणेफेक बजावणार महत्त्वाची भूमिका

विश्वचषकातील भारतीय संघाचा आजचा चौथा समाना आहे. पहिल्या तीन सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवल आहे. त्यामुळे टीम इंडिया ज्या फॉर्ममध्ये आहे ते लक्षात घेता पुण्यात विजयाच्या अपेक्षा आहेत. मात्र, भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यांचा इतिहास पाहिला तर, जमेची बाजू ही भारताच्या बाजूने आहे. मात्र, बांग्लादेशने शेवटच्या 4 पैकी 3 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. त्यात दोन मायदेशात तरस एक सामना श्रीलंकेतील आशिया कप दरम्यान जिंकला आहे. त्यामुळे बांग्लादेशच्या खेळाडूंचेही मनोबल वाढलेले आहे.

रेकॉर्ड काय?

अलीकडील विजयाचे रेकॉर्ड्स जरी बांग्लादेशच्या बाजूने असले तरी, आतापर्यंतच्या भारत आणि बांग्लादेशमध्ये झालेल्या 40 एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने 31 सामने जिंकले आहेत तर, बांग्लादेशने फक्त 8 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला होता. 2007 मध्ये बांग्लादेशने विश्वचषकात भारताला एकदाच पराभूत केले होते. हा भारतीय चाहत्यांसह सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का होता.

चुकीला माफी नाही; भारत-बांग्लादेश सामन्यापूर्वी रोहित शर्माला पुणे पोलिसांनी ठोठावला दंड

अफागिस्तान नेदरलँडने केले उलटफेर

दुसरीकडे, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत कमकुवत मानले जाणारे अफागिस्तान आणि नेदरलँड संघाने बलाढ्य असणाऱ्या इंग्लड आणि दक्षिण आफ्रिका संघाचा पराभाव केला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात जर बांग्लादेशने भारताला पराभूत केल्यास हा यंदाच्या विश्वचषक हंगामातील तिसरा उलटफेर असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला सावध खेळी करणे आवश्यक आहे. कारण, यापूर्वी 2019 च्या विश्वचषकात बांग्लादेशने भारताने दिलेले 315 धावांचे लक्ष्य जवळपास पूर्ण केले होते.

एमसीए मैदानावरील रेकॉर्ड काय सांगतात?

आज भारत विरूद्ध बांग्लादेश संघामध्ये पुण्यातील एमसीए मैदानावर सामना होणार आहे. या मैदानाबाबत सांगायचे झाल्यास टीम इंडियाने येथे 7 वनडे सामने खेळले आहेत त्यापैकी 4 जिंकले आहेत, तर 3 गमावले आहेत. म्हणजे रेकॉर्ड जवळपास समान आहे. येथील खेळपट्टी मोठ्या धावसंख्येची असून, 8 डावात 300 पेक्षा जास्त धावसंख्या उभारण्यात आली आहे. म्हणजेच नाणेफेक जिंकून या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणारा संघ 300 पेक्षा जास्त धावा करून विजयी होऊ शकतो. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 4 सामने जिंकले आहेत, तर पाठलाग करणाऱ्या संघाने 3 सामने जिंकले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube