World Cup 2023 : …म्हणून भारत-बांग्लादेश सामन्यात नाणेफेक बजावणार महत्त्वाची भूमिका
World Cup 2023 : विश्वचषकात (World Cup 2023) भारत आज आणखी एक सामना खेळणार आहे. यामध्ये पुण्यात आज भारत बांग्लादेश भिडणार आहेत. या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. स्पर्धेतील सेमीफायनलच्या दृष्टीने आजचा सामना भारतासाठी (IND vs BAN) महत्वाचा ठरणार आहे. तर बांग्लादेशनेही (Bangladesh) सामना जिंकण्याचा निश्चय केला आहे. सध्या या स्पर्धेत अनेक उलटफेर होताना दिसत आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ काय निर्णय घेऊ शकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नाणेफेक बजावणार महत्त्वाची भूमिका...
दरम्यान भारत बांग्लादेश यांच्या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कारण हा सामना पुण्यामध्ये खेळवला जात आहे. त्यात पुण्याची धावपट्टी ही फलंदाजांसाठी नेहमीच चांगली ठरते. त्यामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या कोणताही संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे. त्यात आतापर्यंतच्या इतिहासात या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या संघाने सरासरी 307 धावा केलेल्या आहेत. त्यामुळे भारत बांग्लादेश यांच्या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
खडसे संकटाच्या फेऱ्यात! कुटुंबियांना 137 कोटींच्या दंडाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
त्यात पुण्यात काल 18 ऑक्टोबर थोडा पाऊस झाला. तर आज आकाश निरभ्र राहणार आहे. तर पुण्याच्या खेळपट्टीबद्दल सांगायचं झालं तर 2013 पासून त्यावर 7 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात आले आहेत. त्यात भारताने 4 सामने जिंकले आहेत तर 3 गमावले आहेत. त्यात यावेळी देखील भारतच जिंकण्याची शक्यता आहे. कारण शेवटचे दोन सामने भारतानेच जिंकलेले आहेत. असं बोललं जात आहे.
एक भेट-चर्चा अनेक! राहुल नार्वेकर आणि CM शिंदेंची ‘वर्षा’वर बंद दाराआड खलबतं
विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत भारत बांग्लादेश या दोन्ही संघांनी प्रत्येकी 3 सामने खेळले आहेत. भारताने तीनही सामने जिंकले आहेत. तर बांग्लादेशने केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यात आज विश्वचषकात भारत आज आणखी एक सामना खेळणार आहे. यामध्ये पुण्यात आज भारत बांग्लादेश भिडणार आहेत. त्यामध्ये नाणेफेक आणि फलंदाजी काय भूमिका बजावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारं आहे. मागील चार एकदिवसीय सामन्यांमध्ये बांग्लादेशचं पारडं जड ठरलं आहे. नुकत्याच झालेल्या अशिया कपमध्ये विजेता झालेल्या भारताला बांग्लादेशने पराभूत केले होते.