Download App

IND vs ENG : टीम इंडियाला तीन धक्के; गिल, विराट पाठोपाठ अय्यरही फ्लॉप !

World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG)यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. लखऊतील एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही सलामाची जोडी मैदानात उतरली आहे.  या सामन्यासाठी संघात कोणताही बदल केलेला नाही. भारताची स्थिती भक्कम आहे. संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. तर दुसरीकडे इंग्लंडची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचणेही कठीण झाले आहे. गुणतालिकेतही इंग्लंड तळाला आहे.

Rishabh Pant : ऋषभ पंत वर्ल्डकप खेळणार का? टीम इंडियातील कमबॅकचा अपडेट मिळाला

विश्वचषकात आतापर्यंत भारतीय संघाला प्रथम गोलंदाजीच मिळाली होती. हा पहिलाच सामना असा आहे ज्यात भारत प्रथम फलंदाजी करताना दिसत आहे. सुरुवातील रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली आहे. सुरुवातही चांगली झाली नाही. भारताला शुभमन गिलच्या रुपात पहिला झटका बसला आहे. गिल फक्त 9 धावा काढून क्रिस वोक्सच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर आता विराट कोहली मैदानात आला आहे. 20 ओव्हर्सचा खेळ झाला असून भारताने तीन विकेट गमावत 73 धावा केल्या आहेत.

विराटचा भोपळा तर श्रेयसच्या फक्त 4 धावा 

सलामीवीर फलंदाज शभमन गिल स्वस्तात बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला होता. मात्र तोही फार काही करू शकला नाही. त्याला एकही रन करता आला नाही. डेविड विलीच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सकरवी झेलबाद झाला. त्यामुळे टीम इंडियाला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले. आता रोहित शर्मा असून त्याच्या साथीला श्रेयस अय्यर मैदानात आला आहे.

असा आहे भारताचा संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शमी, जसप्रित बुमराह, सिराज.

असा आहे इंग्लंडचा संघ 

जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार), लायम लिविंगस्टोन, मोईन अली, क्रिस वोक्स, डेविड विली, आदिल रशीद आणि मार्क वूड.

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच केला ‘हा’ कारनामा

Tags

follow us