World Cup 2023 : येत्या 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा (World Cup 2023) थरार रंगणार आहे. विश्वचषकावर आपल्या देशाचे नाव कोरण्यासाठी सर्वच संघांनी जोरदार तयारी केली असून, आता सामने सुरू झाल्यानंतर कोणता संघ मैदानात सरस ठरणार आणि कोणता कमजोर ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वी विश्वचषकात सहभागी होणाऱ्या प्रमुख संघांची ताकद आणि कमजोरी का आहे याचा लेखाजजोखा मांडणारी ही बातमी. (Key Points Of South Africa Bangladesh & England Cricket Team)
बांग्लादेश संघात अनेकांना घाम फोडण्याची ताकद
काही वर्षांपूर्वी अनेक संघाकडून पराभरावचा सामना करणाऱ्या बांग्लादेशचा संघ आता चांगलाच ताकदवान झाला आहे. या संघात मोठं-मोठ्या संघांना मैदानात घाम फोडण्याची ताकद आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत बांग्लादेशच्या संघाने भारताला पराभूत करत मोठा आत्मविश्वास संपादित केला आहे.
एक काळ असा होता की बलाढ्य संघाविरुद्धचा सामना झाल्यास बांगलादेश क्रिकेट संघाचा पराभव निश्चित मानला जात असे. पण काळ बदलला आणि कोणत्याही बलाढ्य संघाला हरवणारा संघ म्हणून बांग्लादेशने निर्माण केली. शकीब अल हसनच्या नेतृत्वाखालील हा संघ यावेळी सर्वोत्तम खेळी करण्याचा प्रयत्न करेल. 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या एकदिवसीय विश्वचषकात या संघाने चांगली सुरुवात केली होती.
बांग्लादेशची ताकद आणि कमजोरी काय?
बांग्लादेशकडे (Bangladesh Team ) चांगले फलंदाज आणि फिरकीपटू आहेत. या संघाकडे शकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांच्या रूपाने दोन चांगले फिरकी गोलंदाज आहेत जे भारतीय भूमीवर फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतात. मिराज केवळ त्याच्या उत्कृष्ट ऑफ स्पिनसाठी नव्हे तर, चांगल्या फलंदाजीसाठीदेखील परीचित आहे. याशिवाय संघात लिटन दास, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला आणि नजमुल हसन शांतो या दिग्गज फलंदाजांची फौज आहे.
तमिमच्या अनुपस्थितीमुळे बांग्लादेशसमोर सलामीला कोणाला पाठवायचे असा प्रश्न आहे. तमिमच्या जागी संघाकडून तनजीद हसन, मोहम्मद नईम असे पर्याय आहेत. जे लिटन दाससोबत डावाची सुरुवात करू शकतात. संघातील अनेक दिग्गज वेगवान गोलंदाज इबादत हुसेन दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे संघाचे टेन्शन वाढले असून, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांची जाबाबदारी वाढली आहे.
MP Election 2023 : मध्य प्रदेश कुणाचं? सर्व्हेतून ‘या’ पक्षाला मिळाली गुडन्यूज !
विश्वचषकासाठी बांग्लादेशचा संघ
शाकिब अल हसन (कर्णधार), नजमुल हसन शांतो (उपकर्णधार) लिटन दास, तंजीद हसन तमीम, तौहीद हृदॉय, मुश्फिकुर रहीम, महामुदुल्लाह, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, महेदी हसन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शोरेफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब.
इंग्लंड संघात पुन्हा चॅम्पियन बनण्याची ताकद पण…
2019 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा इंग्लंड संघात पुन्हा चॅम्पियन बनण्याची ताकद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्यावेळेप्रमाणेच या वेळीही इंग्लंड संघाने अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. 2015 च्या विश्वचषकात इंग्लंडला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. बांग्लादेशकडून पराभूत झाल्यानंतर इंग्लंडचा संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. (England Team)
धक्कादायक! देशातील 42 टक्के ग्रॅज्यूएट बेरोजगार; एमबीए, इंजिनिअरांना व्हायचंय ‘कारकून’
इंग्लंड संघाची ताकद काय?
गेल्या विश्वचषकातील स्टार जेसन रॉयला डावलून युवा फलंदाज हॅरी ब्रूकला संधी देण्यात आली आहे. याशिवाय संघात स्फोटक अशा फलंदाजांची फौज आहे. आघाडीच्या फळीत जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलानसारखे फलंदाज आहेत आणि मधल्या फळीत बेन स्टोक्स, कॅप्टन बटलर आणि ब्रूकसारखे फलंदाज असून, हे सर्व फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. संघात ख्रिस वोक्स, सॅम कुरन, डेव्हिड विली, मार्क वूड असे गोलंदाज आहेत जे फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान देऊ शकतात.
याशिवाय गोलंदाजीतही संघ मजबूत स्थितीत असून, विली, कुरन आणि रीस टोपली यांच्या रूपाने तीन डावखुरे वेगवान गोलंदाज आहेत. याशिवाय मार्क वुडच्या रूपात एक वेगवान गोलंदाजही आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य गोलंदाजांव्यतिरिक्त संघात लियाम लिव्हिंगस्टन, हॅरी ब्रूक आणि जो रूटसारखे फलंदाज आहेत. जे वेळ पडल्यास गोलंदाजीत हातभार लावू शकतात.
BJP : सुमार कामगिरी करणारे खासदार ‘घरी’ बसणार; बावनकुळे, महाजन, मुनगंटीवारांना मिळणार दिल्लीचे तिकीट
कमजोरी काय?
ज्या पद्धतीने इंग्लंड संघ मजबूत दिसत असला तरी, या संघात अनेक कमतरतादेखील आहेत. संघातील प्रमुख खेळाडूंचा फॉर्म हा संघासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. संघाच्या टॉप ऑर्डरमध्ये अनुभवी फलंदाज जो रूटचाही समावेश आहे. मात्र, गेल्या विश्वचषकानंतर त्याला त्याच्या फलंदाजी हवी तशी ताकद दाखवता आलेली नाही. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो पूर्णपणे अपयशी ठरला होता.
याशिवाय गोलंदाजीत सॅम कुरन आणि वेगवान गोलंदाज मार्क वुडचा फिटनेस आणि फॉर्मही हा चिंतेचा विषय आहे. इंग्लंडकडे डावखुरे मध्यमगती गोलंदाज आहेत पण डावखुरा फिरकीपटू नाहीत. मुख्य फिरकीपटू म्हणून संघात केवळ आदिल रशीद आहे.
विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ
जोस बटलर (कर्णधार-विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सन, मार्क वुड, आदिल रशीद आणि रीस टोपली
दक्षिण आफ्रिका कागदावर मजबूत पण…
टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषक जिंकण्याच्या मिशनसह भारतात पोहोचला आहे. चोकर्सचे बिरुद मिरवणारा हा संघ कागदावर मजबूत दिसून येत आहे. संघात फलंदाजांची फौज असून, जी सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.
दक्षिण आफ्रिकेची ताकद किती?
दक्षिण आफ्रिका (South Africa Team) आयसीसी क्रमवारीत अनेकदा चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकाचा संघ राहिला आहे. सध्या संघाची सर्वात मोठी ताकद त्यांची फलंदाजी आहे. क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम आणि डेव्हिड मिलर हे टॉप-5 मधील असे फलंदाज आहेत जे कधीही सामना फिरवू शकतात. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर संघात खागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, मार्को जेन्सनसारखे वेगवान गोलंदाज आहेत. मात्र, संघाला एनरिके नॉर्शियाची नक्कीच उणीव भासेल.
दक्षिण आफ्रिकेची कमजोरी काय?
संघाची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे स्वतः कर्णधार टेंबा बावुमा. एक कर्णधार म्हणून तो संघासोबत स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण करू शकत नाही. फिरकीपटू, केशव महाराज आणि तबरेझ शम्सी भारतातील खेळपट्यांचा अनुभव नाही. त्यामुळे या दोघांना मोठ्या सत्वपरिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ खालीलप्रमाणे
टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जेन्सेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, ए. फेलुक्वायो, खगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर डुसे, लिझाद विल्यम्स