BJP : सुमार कामगिरी करणारे खासदार ‘घरी’ बसणार; बावनकुळे, महाजन, मुनगंटीवारांना मिळणार दिल्लीचे तिकीट

BJP : सुमार कामगिरी करणारे खासदार ‘घरी’ बसणार; बावनकुळे, महाजन, मुनगंटीवारांना मिळणार दिल्लीचे तिकीट

मुंबई : भाजपने महाविजय 2024 अंतर्गत आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातील 45+  जागा जिंकण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. यासाठी आता भाजपने आखणीही सुरु केली असून याअंतर्गत काही कठोर पावलं उचलली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपने गेल्या पाच आणि 10 वर्षांमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या खासदारांची तिकीटे कापण्याचे धोरण स्विकारले आहे, तर राज्यातील दिग्गज नेत्यांना दिल्लीत पाठविण्याचा विचार सुरु केला आहे. (Rahul Narvekar, Vinod Tawde, Ravindra Chavan, Sanjay Kelkar, Ram Satpute, Sudhir Mungantiwar, Girish Mahajan and Chandrasekhar Bawankule)

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही सर्वेक्षणांमधून भाजपला आगामी लोकसभेसाठी धोक्याची घंटा मिळाली आहे. हा धोका ओळखून आतापासूनच पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज्यात सुमार कामगिरी असलेल्या खासदारांची तिकीट कापली जाण्याची शक्यता आहे. त्या जागी काही नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Sanjay Shirsat : महाविकास आघाडीचं काय होणार? शिरसाट म्हणाले, भविष्यात सगळ्यांना…

मुंबई, खान्देश आणि विदर्भात भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतो. यामध्ये मुंबईतून राहुल नार्वेकर, विनोद तावडे, ठाण्यातून रवींद्र चव्हाण किंवा संजय केळकर यांना संधी दिली जाऊ शकते, तर सोलापूरमधून राम सातपुते, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, जळगावमधून गिरीश महाजन आणि वर्ध्यातून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा आहे.

महाविकास आघाडीने इंडिया आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील दिग्गजांना तोंड देण्यासाठी अनुभवी आणि रसद असलेला नेता असावा असा होरा या निर्णयामागे असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी भाजपकडून आगामी निवडणुकीमध्ये धक्कातंत्राचा वापर केला जाऊ शकतो, अशी शक्यता राज्याच्या राजकारणात वर्तविली जात आहे.

Maharashtra Politics : लवकरच शिंदे गटाला भगदाड पडणार; ठाकरेंच्या खासदाराचं वक्तव्य

48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख :

दरम्यान, भाजपने काही दिवसांपूर्वीच राज्याच्या 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. पण कदाचित हेच निवडणूक प्रमुख आगामी निवडणुकीत पक्षाचे उमेदवार असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पुणे लोकसभेची जबाबदारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत मोहोळ यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, भाजपने त्यांच्या खांद्यावर ही नवी जबाबदारी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बारामती मतदारसंघात आमदार राहुल कुल यांच्याकडे तर शिरुर लोकसभा मतदारंसघाची जबाबदारी भाजप आमदार महेश लांडगे यांच्याकडे दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube