Download App

Yashasvi Jaiswal : ‘यशस्वी’ ‘द्रविड’लाही भारी, आता टक्कर ‘विराट’ला; नवा विक्रम करत मिळवला दुसरा नंबर

Yashasvi Jaiswal : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना (IND vs ENG Test) रांची येथे सुरू आहे. या सामन्यात भारताचा डाव गडगडल्याचे दिसून आले. मात्र टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) अर्धशतकी खेळी करत आणखी एक विक्रम केला आहे. यशस्वीने माजी कर्णधार राहुल द्रविडचा (Rahul Dravid) विक्रम मोडला आहे. तसेच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत यशस्वी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता त्याच्यापुढे फक्त विराट कोहलीच (Virat Kohli) आहे. विराट कोहलीने 655 धावा केल्या आहेत. यानंतर दुसरा क्रमांक राहुल द्रविडचा होता. त्याने 603 धावा केल्या आहेत. आता मात्र यशस्वी जैस्वालने राहुल द्रविडला मागे टाकले आहे. 604 धावा करत त्याने द्रविडचा विक्रम मोडला आहे.

Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला लागली लॉटरी! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीम इंडियात मिळालं स्थान

इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहली प्रथम क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 655 धावा केल्या आहेत. सध्या विराट कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. या मालिकेतील आणखी एक सामना शिल्लक आहे आणि यशस्वीही विराटच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अशा परिस्थितीत यशस्वीला संधी आहे. त्याने पुढील कसोटीत जर 50 पेक्षा जास्त धावा केल्या तर विराटला मागे टाकून तो पहिल्या क्रमांकावर नक्कीच येऊ शकतो.

यशस्वी जैस्वालने कसोटी क्रमवारीतही (ICC Rankings) मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध सलग दोन द्विशतके झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) क्रमवारीत 14 स्थानांची प्रगती केली आहे. तो आता 15व्या क्रमांकावर जाऊन पोहचला आहे. तीन भारतीय खेळाडूंनी वनडे क्रमवारीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. शुभमन गिल, विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.

जैस्वालने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावले होते. विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात जैस्वालने भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना 209 धावा केल्या. यानंतर, राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने 214* धावा केल्या. याशिवाय जैस्वालने हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही 80 धावांची खेळी केली होती.

Akash Deep : फक्त एक चूक अन् आऊट झालेला फलंदाज नॉट आऊट; आकाशदीपनं नेमकं काय केलं ?

follow us