Download App

आंबेडकरांचं संविधान भाजपला मान्य नाही, 2024 ला सत्तेवर आले तर…; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Aditya Thackeray : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी (Mla Disqualification Case Verdict) काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी काल निकाल दिला. हा निकाल देतांना त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय शिंदे गटाचे भरत गोगावलेंचा व्हीप वैध ठरवला. दरम्यान, या निकालानंतर ठाकरे गटाने सडकून टीका केली. आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही जोरदार टीका केली. निकाल गद्दारांच्या बाजूनं लागत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान भाजपला मान्य नाही, असं ते म्हणाले.

नार्वेकरांचा निर्णय आश्चर्यकारकच; अपात्र आमदार निकालावर असदुद्दीन ओवैसींचे टीकास्त्र 

आज माध्यमांशी संवाद साधतांना आदित्य ठाकरेंनी अनेक विषयावर भाष्य केलं. त्यांना विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाबाबत विचारले असता ते म्हणाले, कालचा निकाल हा लोकशाहीला मारून टाकणारा आहे. सुप्रीम कोर्ट आणि राज्यघटना यांना बाजूला सारून चोरांना आणि गद्दारांना वाचण्याचा प्रयत्न विधानसभा अध्यक्षांनी केली. त्यामुळं आता ही केवळ आमची आमची नाही, आता ही लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई झाली आहे. जर निकाल गद्दारांच्या बाजूने लागत असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान भाजपला मान्य नाही, हे स्पष्ट होतं. त्यामुळं 2024 ला पुन्हा चुकून ते सत्तेवर आले तर भाजपचं वेगळं संविधान देशावर लादतील, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

खळबळजनक! कुख्यात गुंड शरद मोहोळच्या बॅनरवर ‘देशभक्त’ असा उल्लेख 

नार्वेकरांनी दिलेला म्हणजे सुप्रीम कोर्टाचा सुद्धा अपमान केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सला बाजूला करून निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर कालचा निकाल होता, असं ठाकरे म्हणाले.

31 ऑगस्टला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अपात्रतेविषयी विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार आहेत. त्याविषयी विचारलं असता आदित्य म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी कालचा निकाल हा दिल्ली वरून लिहून घेतला होता. राष्टवादीबद्दलही असचं होणार आहे.

फासावर लटकवलं तरी चालेल
अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक झाला होता. संजय राऊत यांनी विधासभा अध्यक्षांवर सडकून टीका केलीह होती. आदित्य ठाकरे यांनीही जोरदार हल्लाबोल केला. त्यांना असंसदीय शब्द वापरल्याचा आरोप करत त्यांच्यावर शिंद गटाकडून हक्कभंग प्रस्ताव आणला जाणार आहे. यावरही ठाकरेंनी भाष्य केलं. फासावर लटकावलं तरी चालेल. पण, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष लोकशाही आणि संविधानाचे मुडदा पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, ते होऊ देणार नाही, असं ठाकरेंनी ठणकावलं.

 

follow us