हा निकाल म्हणाजे निर्लज्जपणाचा कळस, अपात्रतेच्या निकालावर आदित्य ठाकरे कडाडले
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांना पात्र ठरवलं आहे. मात्र खरी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचे सांगितले. तसेच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचाच व्हिप वैध असल्याचा निकाल दिला आहे. यावरुन आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी हल्लाबोल केला आहे. हा निकाल म्हणाजे निर्लज्जपणाचा कळस आहे, असे म्हटले आहे.
शिवसेनेच्या निकालानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हा निकाल म्हणजे ह्या ट्रिब्युनलच्या निर्लज्जपणाचा कळस आहे. भाजप प्रणित गद्दारांची राजवट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेच्या विरोधात असल्याचे उघड आहे. लोकशाही संपवण्यासाठी त्यांना राज्यघटना पुन्हा लिहायची आहे. आज ह्या निकालाने आपल्या राज्यातील लोकशाही आणि राज्यघटनेच्या तत्त्वांचा आणि स्तंभांचा अधिकृतपणे खून केला आहे.
आजचा निकाल स्क्रिप्टेड, महाशक्तीच्या आदेशानुसार नार्वेकरांचा निर्णय; कॉंग्रेस नेत्यांचे टीकास्त्र
ते पुढं म्हणाले की लोकशाही पुन्हा स्थापित करण्यासाठी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही लढा देऊ. हा निकाल फक्त शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याबद्दल नव्हता. हे आपल्या देशाच्या संविधानाबद्दल आणि लोकशाहीबद्दल आहे. आम्हाला आशा आहे की सर्वोच्च न्यायालय ह्या लांच्छनास्पद राजकीय खेळापासून संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो… शिवसेनेच्या निकालावर देवेंद्र फडणवीस थेट बोलले
सहानुभूती मिळविण्यासाठी खोडसाळ प्रचार
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात अस्तित्वात आलेले आपले सरकार पूर्णतः वैध असल्याचा निर्णय आज विधानसभा अध्यक्ष्यांनी दिला आहे. सत्य, वैचारिक दृढता आणि कायद्याच्या आधारे स्थापन झालेले हे सरकार सर्वोच्च न्यायालयातही टिकले आहे. परंतु सहानुभूती मिळविण्यासाठी राजकीय डावपेच खेळून हे सरकार अवैध असल्याचा खोडसाळ प्रचार सतत केला गेला. आजच्या निर्णयातून महाराष्ट्राच्या जनतेचा विजय झाला आहे. हे जनतेचे आपले सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असेल असा विश्वास देतो, असे भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.