Download App

तुर्कीला दणका! PM मोदींचं विमान सायप्रसला; जाणून घ्या, सायप्रसचं महत्व अन् भारताचा प्लॅन

काश्मीरचा मुद्दा असो किंवा दहशतवाद प्रत्येक बाबतीत सायप्रस भारताच्या पाठीशी ठाम उभा राहिला आहे.

PM Narendra Modi Cyprus Visit : सायप्रसचे राष्ट्रपती निकोस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सायप्रसचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III’ ने सन्मानित केले. मागील 23 वर्षांच्या काळात भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच सायप्रस दौरा (Modi in Cyprus) आहे. सन 1974 मध्ये याच देशावर तुर्कीने हल्ला केला होता. यानंतर सायप्रस दोन भागात विभागला गेला.

एका भागावर तुर्की सायप्रस सरकार आणि दक्षिणेतील दोन तृतीयांश भागावर आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त ग्रीक सायप्रस सरकार सत्तेत आहे. पाकिस्तानची मदत करणाऱ्या तुर्कीची (Turkey) याठिकाणी उपस्थिती पीएम मोदींच्या दौऱ्याला आणखी महत्त्वपूर्ण बनवते. भारत आणि सायप्रस यांचे (India Cyprus Relation) संबंध चांगले आहेत. म्हणूनच देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने मोदींना सन्मानित करण्यात आले.

मागील 23 वर्षांच्या काळात भारतीय पंतप्रधानांचा (Indian Prime Minister) हा पहिलाच सायप्रस दौरा आहे. याआधी सन 1982 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि त्यानंतर सन 2002 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी सायप्रसचा दौरा केला होता. अशात तुर्की आणि पाकिस्तानची घट्ट मैत्री पाहता (Pakistan Turkey Relation) पीएम मोदींचा हा दौरा रणनितीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे. सायप्रसने नेहमीच भारताचे समर्थन केले आहे.

काश्मीरचा मुद्दा असो किंवा दहशतवाद प्रत्येक बाबतीत सायप्रस भारताच्या पाठीशी ठाम उभा राहिला आहे. मग पीएम मोदींनी आताच या देशाचा दौरा का केला, भारतासाठी सायप्रस इतका का महत्वाचा आहे याची माहिती घेऊ या..

पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान अन् भारताला दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाठिंबा

तुर्कीशी तणावात पीएम मोदींचा दौरा का महत्वाचा आहे याची माहिती पाच पॉइंट्समधून घेऊ या..

तुर्की विरोधात कूटनीतीक बॅलन्स

सायप्रस आणि तुर्की यांच्यात कायम तणावाची स्थिती असते. उत्तर सायप्रस आणि तुर्कीच्या कब्जावरून दोन्ही देशांत वाद होत असतो. सन 1974 मध्ये तुर्कीने सायप्रसवर आक्रमण केले होते. यानंतर सायप्रसचे विभाजन झालं तेव्हापासून दोन्ही देशांत वाद आहे. तुर्की सातत्याने भारत विरोधी भूमिका घेत आला आहे. काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला साथ देत आला आहे. पाकिस्तानबरोबर सैन्य आणि रणनितिक संबंध वाढवण्यावर भर देत आला आहे.

तर सायप्रस मात्र कायम भारताला पाठिंबा देत आला आहे. अशात भारत आणि सायप्रस यांच्यातील वाढते संबंध लक्षात घेता तुर्कीविरोधात कूटनीतीक बॅलन्स म्हणून पाहिले जात आहे. तसेच जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनातूनही हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

सायप्रस : भारतासाठी युरोपचे गेट वे

सायप्रस देशाचे भौगोलिक स्थान असे आहे की या देशाला भूमध्य सागर आणि युरोपचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. भौगोलिक दृष्टीने सायप्रस आशियात असतानाही या देशाला युरोपीय युनियनचा सदस्य देश म्हणून मान्यता मिळाली आहे. याच कारणामुळे युरोपाशी संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने सायप्रस भारतासाठी महत्त्वाचा आहे. व्यापार, गुंतवणूक आणि रणनितिक संवादाच्या दृष्टीनेही सायप्रस भारतासाठी महत्त्वाचा आहे. युरोपीय युनियनबरोबर (European Union) मुक्त व्यापार करार करण्यासाठी सायप्रस भारताची मदत करू शकतो.

गुंतवणुकीचे आगार

सायप्रस भारतासाठी गुंतवणुकीचे आगार बनत चालला आहे. अनेक भारतीय कंपन्यांनी सायप्रसच्या माध्यमातून युरोप आणि पश्चिम आशियात गुंतवणूक केली आहे. आर्थिक आणि कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित गुंतवणूकिसाठी सायप्रस भारतासाठी नेहमीच फायदेशीर राहिला आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यात सायप्रसच्या उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले.

Iran Israel Conflict हवाई क्षेत्र बंद; पण भारतीयांना मायदेशी पाठवण्यासाठी इराणचा शब्द

इंडिया मिडल ईस्ट युरोप कोरीडोरमध्ये मजबुती

भारताला युरोपाशी जोडणाऱ्या कॉरिडॉरचा सायप्रस हिस्सा आहे. हा कॉरिडॉर भविष्यात भारताला सायप्रसशी जोडेल. भारत मध्य आशिया युरोप कॉरिडॉरच्या माध्यमातून पूर्व – पश्चिम संपर्क आणखी मजबूत होतील. सायप्रसला या कॉरिडॉरशी अधिक मजबुतीने जोडणे हे मोदींच्या दौऱ्याचा एक उद्देश आहे. युरोपीय संघाच्या सदस्याच्या रूपात सायप्रस भारताच्या हितांची नक्कीच काळजी घेऊ शकतो.

भूमध्य समुद्रात खनिज तेल अन् नैसर्गिक वायूची शक्यता

सायप्रस भूमध्य समुद्रात स्थित आहे. याठिकाणी खनिज तेल आहे नैसर्गिक वायू साठे असण्याची शक्यता आहे. सायप्रसची भौगोलिक स्थिती भारताला मिडल ईस्ट आणि युरोपात स्थिर मदत देऊ शकते. आपल्या ऊर्जा स्रोतांत विविधता आणण्याच्या दृष्टीने विचार केला तर आजमितीस सायप्रस भारतासाठी खूप महत्वाचा आहे. तुर्की आणि सायप्रस यांच्यातील कटू संबंध भारताच्या एक प्रकारे पथ्यावरच पडले आहेत.

follow us