‘शेतकरी थांबायला तयार पण, केंद्र सरकारने.. कांदाप्रश्नी शरद पवारांचा मोदी सरकारला सल्ला

Sharad Pawar : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क (Onion Price) वाढविल्याने राज्यात हाहाकार उडाला आहे. या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. वाद वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. या निर्णयानंतरही विरोधकांनी टीकेची धार कमी केलेली नाही. […]

Sharad Pawar

Sharad Pawar

Sharad Pawar : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क (Onion Price) वाढविल्याने राज्यात हाहाकार उडाला आहे. या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. वाद वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. या निर्णयानंतरही विरोधकांनी टीकेची धार कमी केलेली नाही. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारने कांदा खरेदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारने प्रति क्विंटलसाठी दिलेला 2410 रुपये हा भाव कमी आहे. कांद्याला चार हजार रुपये भाव द्यावा, ही मागणी आहे. सरकारने जाहीर केलेल्या भावात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नाही.

‘कांद्यावरील निर्यात शुल्क तत्काळ रद्द करा’; दानवेंनीही टोचले सरकारचे कान

सध्याचा कांदा हा टिकणारा आहे. त्यामुळे शेतकरी थांबायला तयार आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याची मागणीही होत आहे. तेव्हा केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, असेही पवार म्हणाले.

कांद्यावरील निर्यात शुल्क तत्काळ रद्द करा – दानवे

कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा केंद्राचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारने निर्यात शुल्क तातडीने रद्द करावे, अशी मागणी दानवेंनी केली. राज्य सरकाने कांद्याला साडेतीनशे अनुदान देण्याचे विधिमंडळात कबूल केले होते. मात्र अजूनही अनुदान दिलेले नाही. आयात-निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या नाही तर व्यापाऱ्यांच्या फायद्याचे आहे. सरकारने कांदा प्रश्नी तोंडदेखलेपणा करण्याची गरज नाही. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न करत दानवे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी चिघळणार असल्याचा इशारा दिला. याआधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या निर्णयावर टीका केली होती.

Onion Issue : जखम डोक्याला अन् मलम पायाला; केंद्राच्या तोडग्यावर राष्ट्रवादीची टीका

Exit mobile version