Rohit Pawar News : कर्जत-जामखेड मतदारसंघात अजित पवार (Ajit Pawar) यांची सभा झाली असती तर कदाचित उलटा निकालही लागला असता पण ते बारामतीत अडकून पडल्याची कबुली खुद्द शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिलीयं. अजित पवार यांच्या भेटीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कर्जत-जामखेड मतदारसंघात अवघ्या मतांनी विजय मिळाल्यानंतर रोहित पवार यांची प्रितीसंगमावर अजित पवारांशी भेट झाली. या भेटीत माझी सभा झाली असती तर…, थोडक्यात वाचलास असं विधान अजित पवार यांनी केलं. त्यानंतर राम शिंदेंनीही माझ्याविरोधात कटकारस्थान झाल्याचा गंभीर आरोप केलायं.
महाविकास आघाडीच्या पराभवाला जबाबदार कोण? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं…
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले, अजित पवार माझे काका आहेत, त्यामुळे मी पाया पडलो. आमच्या विचारांमध्ये भिन्नता असली तरीही ज्येष्ठांच्या पाया पडणं ही आपली संस्कृती आहे. अजित पवार आमच्या घरातील वडिलधारे आहेत. त्यांनी 2019 साली खूप मतद केली. यशवंतराव चव्हाणांच्या भूमीत भेदभाव करुन चालणार नाही. संस्कृती जोपासलीच पाहिजे, आम्ही संस्कृती जपतो म्हणूनच अजित पवारांच्या पाया पडलो, कर्जत-जामखेडमध्ये अजित पवारांची सभा झाली असती तर कदाचित उलटा निकाल लागला असता, पण अजित पवार बारामतीत अडकून पडले होते, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
राजकारणातून निवृत्त होणार का? शरद पवारांनी एकाच वाक्यात विषय संपवला
प्रितीसंगमावर अजितदादा-रोहित पवारांची भेट..
कराडमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांची आमने-सामने भेट झाली. यावेळी रोहित पवार समोर दिसताच अजित पवार म्हणाले, ढाण्यावाघ थोडक्यात वाचलास…काकांचं दर्शन घे…कर्जत-जामखेडमध्ये एखादी माझी सभा झाली असते तर विचार कर काय झालं असतं, असं अजित पवार यांनी मिश्किलपणे रोहित पवारांना म्हटलंय.
रणजितसिंह मोहितेंनी भाजप विरोधात काम केले, त्यांची हकालपट्टी करा, राम सातपुतेंचा गंभीर आरोप
पवार कुटुंबियांकडून कटकारस्थान…
अजित पवार यांनी काही कारणे देऊन कर्जत-जामखेड मतदारसंघात सभा घेणं टाळलं. स्वत: उमेदवार असून पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वेळ मिळाला नसेल, असा आम्ही विचार केला. त्यानंतर अजित पवारांबाबत कानावर काही गोष्टी येत होत्या, पण आज त्याची खात्री पटलीयं. अजित पवार यांनी आज ज्या पद्धतीने विधान केलंय., त्यावरुन माझ्याविरोधात पवार कुटुंबियांनी कट रचल्याचा आरोप राम शिंदे यांनी केलायं. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत दखल घ्यावी, असंही राम शिंदेंनी स्पष्ट केलंय.