Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार देखील सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण? बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सुरक्षा अचानक वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या घराची देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
आज देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर पोहोचताच त्यांच्यासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले. त्यांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांच्या ‘फोर्स वन’ टीमचे जवान शस्त्रांसह तैनात करण्यात आले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांच्या घराची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. त्यांच्या घराच्या मुख्य गेटवर शस्त्रांसह ‘फोर्स वन’ टीमचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, मात्र इंटेलिजन्स ब्युरोसह विविध सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
तर दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून राज्यात लॉरेन्स बिष्णोई गँग धमक्या देत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सुरक्षित ठेवण्यासाठी ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी सर्व 288 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मत मोजणी होणार आहे.
निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक निवडणूक
अधिसूचना जारी करण्याची तारीख- 22.10.2024 (मंगळवार)
नामांकनाची अंतिम तारीख- 29.10.2024 (मंगळवार)
पुराने हाहाकार! स्पेनमध्ये 200 पेक्षा जास्त मृत्यू; आणीबाणीची घोषणा
नामांकन छाननीची तारीख- 30.10.2024 (बुधवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख- 04.11.2024 (सोमवार)
मतदान तारीख- 20.11.2024 (बुधवार)
मतमोजणीची तारीख – 23.11.2024 (शनिवार)