अमरावती : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर तिवसा तालुक्यातील (Teosa) भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर विश्वास दाखवून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळं भाजपला मोठं खिंडार पडले असून याचा मोठा फटका महायुतीचे उमेदवार राजेश वानखडे यांना बसणार आहे.
यशोमती ठाकूर यांचे हात बळकट, महाराष्ट्र युवक नाभिक महासंघाने दिला जाहीर पाठिंबा…
तिवसा तालुक्यातील भाजपच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश झाला आहे. भाजपची धोरणे शेतकरी विरोधी असल्याने आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याची खंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यशोमती ठाकूर यांच्या कामांवर आणि नेतृत्वांवर विश्वास ठेवून या युवकांनी भाजपला तिवसा तालुक्यात खिंडार पाडले आहे. भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने यशोमती ठाकूर यांचे हात बळकट झाले आहेत. त्यामुळं भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
विरोधक षडयंत्र रचतील, दिशाभूलही करतील, त्यांचा डाव हाणून पांडा; यशोमती ठाकूर यांचे आवाहन
यावेळी यशवर्धन ठाकूर, वैभव वानखडे तिवसा तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष, योगेश वानखडे, गजानन काळे, रूपालीताई काळे, विश्वजीत बाखडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रामुख्याने योगेश बंड- भाजपा युवा मोर्चा अमरावती जिल्हा, आशिष कोंडे, सचिन राऊत, मयूर पन्नासे, पंकज कोंडे, प्रशांत तुप्पट, सुरज कोंडे, अक्षय बाळस्कर, ज्ञानेश्वर काळे, भूषण भोयर, रोशन भोयर, रोशन पाटीलपैक, शुभम बाळास्कर, आर्यन भोकासे, नमन भोकसे, प्रशांत बंड, यश बंड, आकाश पुंड, कुणाल कोंडे, प्रविण भोयर, यांच्यासह असंख्य युवकांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी सर्वांनी पक्षासाठी एक निष्ठेने काम करू अशी ग्वाहीही दिली.