Bengali superstar Prasanjit Chatterjee to produce Hindi series ‘Kabhi Neem Neem Kabhi Shahad Shahad’ to launch on Star Plus : ‘स्टार प्लस’ वाहिनीने अलीकडेच त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘कभी नीम नीम कभी शहद शहद’ या नवीन मालिकेची घोषणा करण्याकरता एका शानदार पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या मालिकेची कथा नातेसंबंधांच्या खट्ट्यामिठ्ठ्या चवींना नेमकेपणाने टिपते. आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते ते मालिकेतील कलाकार.
या मालिकेत भूमिका करणारी सर्व कलाकार मंडळी या पत्रकार परिषदेला उपस्थित होती. त्यात बंगाली चित्रपट उद्योगातील दिग्गज सुपरस्टार प्रसनजीत चॅटर्जी यांचाही समावेश होता, ज्यांनी या मालिकेद्वारे निर्माता म्हणून हिंदी दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये आपले पाऊल नव्याने रोवले आहे. बंगाली चित्रपट उद्योगाचे सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे प्रसनजीत चॅटर्जी हे या मालिकेच्या शुभारंभानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते.
मुंबई शहरातील जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह.. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर थेट वार
ही पत्रकार परिषद हसतखेळत, मजेदार आणि हृदयस्पर्शी परस्पर संवादात पार पडली. या परिषदेत मालिकेतील कलाकारांनी ते वठवीत असलेल्या पात्रांविषयी, मालिकेच्या अत्यंत वेगळ्या कथनाविषयी स्वत:चे मत व्यक्त केले. हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातील निर्माता म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे प्रसनजीत चॅटर्जी यांनी ही भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि आणि सर्वांना आपलीशी वाटणारी कथा प्रेक्षकांसमोर सादर करत असल्याबद्दल आनंद आणि उत्साह व्यक्त केला.
UPSC Result 2025 : पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, पहिल्या अन् दुसऱ्या क्रमांकावर कोण?
पत्रकार परिषदेतील सर्वात रंजक भाग होता, तो म्हणजे एक हलक्याफुलक्या खेळांचा! ज्यात प्रसनजीत दादा आणि उदय वीर दादाजी या दोघांच्या टीमने पदार्थ नेमका कोणता आहे, ते ओळखत पदार्थाचे नाव सांगण्याविषयी अंदाज व्यक्त केला. या खेळात त्यांच्यातील एकमत आणि प्रसंगावधान पणाला लागले. या खेळात उदय व कथा हेही एकत्र सहभागी झाले आणि खेळाची रंगत अधिकच वाढली, ज्यामुळे प्रेक्षकवर्गाला निखळ मनोरंजन अनुभवता आले.
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं विदारक वास्तव; वाचा, १ जानेवारी ते ३१ मार्चचे धक्कादायक आकडे
ही मालिका म्हणजे भाव-भावना, नाट्य आणि कौटुंबिक संबंधांची एक ताजेतवाने करणारी सरमिसळ आहे, जी मालिकेच्या नावाप्रमाणेच खट्ट्या-मिठ्ठ्याचा परिपूर्ण समतोल व्यक्त करते.‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘कभी नीम नीम कभी शहद शहद’ ही मालिका पाहायला विसरू नका, ही मालिका लवकरच तुमच्या घरी एक हृदयस्पर्शी आणि सर्वांच्या मनाला स्पर्श करणारी कथा घेऊन अवतरणार आहे!