Download App

Swargandharv Sudhir Phadake चित्रपटाचं मोहन भागवतांकडून भरभरून कौतुक…

Mohan Bhagvat Appreciate to Swargandharv Sudhir Phadake film : ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ ( Swargandharv Sudhir Phadake ) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच हा चित्रपट सरसंघचालक मोहन भागवत ( Mohan Bhagvat ) यांनी चित्रपटाच्या टीमसोबत पाहिला आणि या चित्रपटाचे भरभरून कौतुक ( Appreciate ) केले.

इंडियन पोस्ट खात्यात ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 63 हजार रुपये पगार

सुधीर फडके म्हणजेच ‘बाबुजी’ हे व्यक्तिमत्वच इतके महान होते, जगभरात या व्यक्तिमत्वाची ख्याती पसरली आहे. त्यांची व्यायसायिक कारकीर्द आपल्यापैकी अनेकांना माहित आहे आहे. परंतु या यशामागचा त्यांचा संघर्ष, त्यांचे वैयक्तिक आयुष्य फार कमी जणांना माहित आहे. त्यांची जीवनगाथा आपल्याला या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. बाबुजी गायक, संगीतकार होतेच, परंतु ते एक सच्चे देशभक्तही होते.

‘मोदींनी गरीबांना एक रुपयाचीही कर्जमाफी दिली नाही’; राहुल गांधींचा घणाघात

चित्रपटाबद्दल सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, ‘बाबुजी म्हणाले होते, कोणतेही गीत गाताना भावना त्या शब्दांसोबत आल्या पाहिजेत. केवळ सूर असून चालत नाही. तेव्हा त्याचे महत्व आम्हाला फारसे समजले नाही. परंतु हा चित्रपट पाहून बाबूजींचा संगीतामागचा भाव लक्षात आला. त्यांची देशभक्ती, त्यांनी सोसलेले कष्ट पाहाताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्यय येतो. ही गाणी ऐकताना पुन्हा त्याच विश्वात गेल्याचा भास होतो. उत्तम लेखन, दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट कलाकारांची निवड यामुळे हा चित्रपट एका उंचीवर गेला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी सुवर्णकाळ उभा केला असून महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना हा नक्कीच आवडेल, असा हा चित्रपट बनला आहे.’

सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

follow us