मोदींना पंचाहत्तरीनंतर थांबा म्हणणार नाही, पण काही लोक… पवारांचा भागवतांना टोला अन् मोदींची पाठराखण
Sharad Pawar पंतप्रधान मोदींचा 75 वा वाढदिवस झाला. यावर पवार म्हणाले, मी पंचाहत्तरीनंतर थांबलो नाही. मला तसं त्यांना म्हणण्याचा अधिकार नाही.

Sharad Pawar on Narendra Modi Birthday also criticize Mohan Bhagvat : बुधवारी 17 सप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस पार पडला. यानिमित्त जगभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या. यामध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मोदींचं अभिनंदन केलं. त्यावर आज गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी यावर बोलताना सांगितले की,मी वयाच्या 75 व्या वर्षांनंतर देखील थांबलेलो नाही. मग मला तसं त्यांना म्हणण्याचा नैतिकदृष्ट्या अधिकार नाही. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
नरेंद्र मोदी यांनी वयाच्या पंचाहत्तर व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन केलं. या गोष्टींमध्ये राजकारण आणायचं नसतं आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. यामुळेच जगभरातून देखील त्यांना शुभेच्छा आल्या आहेत. पण नरेंद्र मोदी हे अवतारपुरूष असल्याचं म्हणणं मला पटत नाही. त्यामुळे त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही.
अशाच प्रकारे राजकारणमध्ये न आणता मोदी माझ्या पंचाहत्तरव्या वाढदिवसाला आले होते. आम्हीही राजकारण मध्ये आणत नाही. दरम्यान यावेळी शरद पवारांनी भाजपच्या वयाच्या 75 व्या वर्षांनंतर नेत्यांनी पदावर न राहण्याच्या नियमाबद्दल विचारले असता. त्यांनी मिश्किलपणे म्हटलं की, मी वयाच्या 75 व्या वर्षांनंतर देखील थांबलेलो नाही. मग मला तसं त्यांना म्हणण्याचा नैतिकदृष्ट्या अधिकार नाही. तसेच काही लोक म्हटले आहेत की, आम्ही 75 व्या वर्षांनंतर थांबू असं आम्ही म्हटलोच नव्हतो. असं म्हणत ते आता युटर्न घेत आहेत. असं म्हणत शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना टोला लगावला आहे.
पदावर राहण्यासाठी भाजपकडून वयाची अट…
दरम्यान भाजपने आपल्या पक्षाकडून पदावर राहण्यासाठी वयाची मर्यादा घालून दिली होती. त्यामध्ये वयाच्या 75 व्या वर्षांनंतर नेत्यांनी पदावर न राहता नैतिकतेने हे पद सोडावे असं सांगितलं गेलं होतं. त्यात अनेक नेत्यांना हळू हळू दूर देखील केलं गेल. मात्र आता जेव्हा पंतप्रधान मोदी हे वयाच्या 75 वर्ष पुर्ण झाले आहेत. त्यानंतर मात्र या नियमावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आम्ही 75 व्या वर्षांनंतर थांबू असं आम्ही म्हटलोच नव्हतो.असं म्हणत युटर्न घेत घेतला आहे.
Liquor Shop Licenses : नेत्यांचे हित टळले, मद्यविक्री परवाने गुंडाळले; महसूल धोरणात हलचल