Swargandharv Sudhir Phadake चित्रपटा निमित्त ‘गीतरामायण’च्या आठवणींना उजाळा

Swargandharv Sudhir Phadake चित्रपटा निमित्त ‘गीतरामायण’च्या आठवणींना उजाळा

Swargandharv Sudhir Phadake film promotion : संगीतविश्वातील एक मोठे नाव म्हणजे सुधीर फडके. स्वरगंधर्व सुधीर फडके ( Swargandharv Sudhir Phadake ) म्हणजेच ‘बाबूजी’ यांच्या ‘गीतरामायण’ या अद्भुत निर्मितीस 69 वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधत रिडिफाईन प्रॉडक्शन्सने पुण्यात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Maylek चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले; उमेश कामतचीही महत्वाची भूमिका

या कार्यक्रमात श्रीधर फडके, आनंद माडगुळकर ही सुधीर फडके, ग. दि. माडगुळकर यांची पुढील पिढी, आकाशवाणी पुणे केंद्राच्या काही सन्माननीय व्यक्ती, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सौरभ गाडगीळ, लेखक, दिग्दर्शक, निर्माते योगेश देशपांडे, कलाकार सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, धीरेश जोशी, परितोष प्रधान उपस्थित होते.

‘त्या’ नौटंकीतून लोकांचं मनोरंजनच; विखेंचा लंकेंवर जोरदार निशाणा

यावेळी या मान्यवरांसोबत गप्पांची मैफलही रंगली. या कार्यक्रमादरम्यान ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या २० फूट उंच अशा भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. या पोस्टरवर चित्रपटातील सगळ्या नामांकित व्यक्तिरेखा झळकल्या आहेत. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यावेळी चित्रपटातील ‘गीतरामायण’मधील प्रसिद्ध गाणी आणि ‘गीतरामायण’च्या प्रवासातील अविस्मरणीय क्षणही दाखवण्यात आले.

या कार्यक्रमात सुधीर फडके म्हणजेच ‘बाबूजीं’चे व्यक्तिमत्व, त्यांची गाण्याची आवड, गाणी तयार होताना घडलेले प्रसंग, शब्दांचे गीत होतानाच प्रवासही यावेळी मांडण्यात आला. 1 एप्रिल 1955 रोजी सुरु झालेल्या गीतरामायण शृंखलेचे ७० व्या वर्षात पदार्पण होत असताना, या अजरामर कलाकृतीचा भावपूर्ण, गंधयुक्त आणि सुमधुर आठवणींचा खजिना उलगडण्याचा एक प्रयत्न यावेळी करण्यात आला. एकंदरच ‘गीतरामायणा’चा रंजक प्रवास या कार्यक्रमाच्या निमित्ताने उलगडला. तर कलाकारांनी चित्रपटात व्यक्तिरेखा साकारताना, चित्रीकरणादरम्यान अनुभवलेले प्रसंग यावेळी उपस्थितांसोबत शेअर केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज