‘त्या’ नौटंकीतून लोकांचं मनोरंजनच; विखेंचा लंकेंवर जोरदार निशाणा
Radhakrushna Vikhe On Nilesh Lanke : नगर दक्षिणेत अजून बरेच धमाके होणार असून नौटंकी करुन काही काळ लोकांचे मनोरंजन होईल, असं प्रत्युत्तर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrushna Vikhe) निलेश लंकेच्या (Nilesh Lanke) टिकेवर दिलं आहे. दरम्यान, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालीयं. उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंनी मोहटादेवी गडावर आयोजित स्वाभिमानी जनसंवाद यात्रेतून विखे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली होती. लंके यांच्या टीकेवर राधाकृष्ण विखे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Maidaan निमित्त अजयची प्रांजळ कबुली; सय्यद अब्दुल रहीम यांच्याबद्दल पहिल्यांदाच ऐकलं
विखे म्हणाले, टिका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेच्या न्यायलायात जावून आपण मत मागतो आणि डॉ सुजय विखे नक्कीच निवडून येतील असा विश्वास विेखे पाटलांनी व्यक्त केलायं. तसेच निलेश लंके जो पर्यंत मित्रपक्षात सहकारी होते तो पर्यंत त्यांना मोदीॉ, शहा आणि राजनाथ सिंग यांच्या जिल्हा दौ-याबद्दल आक्षेप नव्हता. आता ते विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचं विेखे पाटलांनी म्हटलंय.
महाविकास आघाडीत फिलगुड! महायुतीला मात्र बंडखोरीचे धक्के, ‘या’ मतदारसंघात डोकेदुखी
निलेश लंके हे विनोद करु शकतात, याचं आश्चर्य वाटतं असल्याच म्हणत सुपा एमआयडीसीमध्ये खंडणीबहाद्दर आणि गुंडांचे स्थान असल्याचं बोलत निलेश लंकेंवर विखेंनी जोरदार निशाना साधला आहे. शिर्डी आणि नगरमध्ये एमआयडीसी उभारली माजी महसूलमंत्र्यांना शेती महामंडळाच्या जमीनी देण्याचं का सूचलं नाही? असा सवालही उपस्थित करत नाव न घेता बाळासाहेब थोरातांवरही राधाकृष्ण विखे यांनी जोरदार टीका केली आहे.
Mahadev Jankar यांच्यासाठी अजित पवार भर उन्हात रिंगणात तर विटेकरांनाही दिलं आश्वासन
काय म्हणाले होते निलेश लंके?
विखे पिता-पुत्र काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे तिकीट मागण्यासाठी गेले होते. पण त्यानंतर ते असं सांगत आहेत की आम्ही शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यातीची मागणी घेऊन शाहा यांच्याकडे गेलो होतो. तुमचा पुत्र नगर दक्षिण मतदारसंघातून खासदार होणार की हे जनता ठरवणार असल्याची जहरी टीका निलेश लंके यांनी विखेंवर केली होती.