Download App

Rajkumar Rao: राजकुमार रावने पटकावला ओटीटी परफॉर्मर ‘ऑफ द इयर’ पुरस्कार

Rajkumar Rao On OTTplay Awards: बॉलिवूडमध्ये आता स्टार किड्सना मागे टाकून अनेक कलाकारांनी आपली छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. राजकुमार राव (Rajkumar Rao) बॉलिवूडमधला (Bollywood) सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनय कौशल्याने सिनेसृष्टीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचे अनेक चित्रपट गाजले आहेत. अलीकडेच या राष्ट्रीय आयकॉनने “गन्स अँड गुलाब्स” (Guns And Gulaabs) या वेब सिरीज आणि “मोनिका, ओ माय डार्लिंग” या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ओटीटी परफॉर्मर ऑफ द इयर (OTTplay Awards) हा पुरस्कार पटकावला.


अनेक भूमिकांमध्ये स्वतःला झोकून देण्याची राजकुमार रावची क्षमता ही कायम उल्लेखनीय ठरली. “गन्स अँड गुलाब्स” मधील एक करिश्माई मेकॅनिकमधून गुंड बनलेल्या पाना टिपूची भूमिका आणि “मोनिका ओ माय डार्लिंग” मधील रोबोटिक्स तज्ञ म्हणून त्याच्या भूमिकेची जोरदार प्रशंसा होऊन याला खूप प्रेम मिळालं. राजकुमार रावने लव सेक्स और धोका, गँग्स ऑफ वासेपूर २, तलाश, यासारख्या अनेक चित्रपटातून स्वत:ची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. शाहिद या सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राजकुमार राव आणि पत्रलेखाचा हा व्हिडीओ पाहून त्यांच्याकडे गूड न्यूज असल्याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत “राजकुमार रावची पत्नी गरोदर आहे”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “पत्रलेखा गरोदर आहे का?”, अशी कमेटं केली आहे. एका नेटकऱ्याने “राजकुमार राव आणि त्याच्या पत्नीला अभिनंदन”, अशी जोरदार कमेंट करत थेट शुभेच्छाच दिल्याचे बघायला मिळाले आहे.

Nagraj Manjule Naal 2: नागराज मंजुळेंच्या ‘नाळ 2’मधील नवं धमाकेदार गाणं प्रदर्शित

राजकुमार रावची पत्नी पत्रलेखाही एक अभिनेत्री आहे. या दोघांनी नोव्हेंबर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजेच 15 नोव्हेंबर दिवशी त्यांच्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस होता. राजकुमार राव आणि त्याच्या पत्नीकडे खरंच गोड बातमी आहे का?, हे लवकरच समजणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज