Bareli ki Barfi! राजकुमार,आयुष्मान-क्रितीच्या दमदार केमिस्ट्रीला सहा वर्ष पूर्ण

Bareli ki Barfi! राजकुमार,आयुष्मान-क्रितीच्या दमदार केमिस्ट्रीला सहा वर्ष पूर्ण

Bareli ki Barfi : बरेली की बर्फी या राजकुमार राव, आयुष्मान खुराना आणि क्रिती सेनन यांचा दमदार अभिनय असलेल्या चित्रपटाला सहा वर्ष पूर्ण झाले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव आला. तर या चित्रपटातील गाण्यांची आणि एकूणच या चित्रपटाची करिष्मा आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

‘आम्ही डरपोकची भाषा दाखवून देऊ’; नितेश राणेंनी संजय राऊतांना घेरलं…

या चित्रपटाचा मुख्य भाग म्हणजे राजकुमार रावचा दमदार अभिनय तसेच त्याची भूमिका देखील मास्टरक्लास होती. प्रीतम विद्रोही असं त्याच्या पात्राचं नाव होतं. त्याने या भूमिकेत जीव ओतला होता. प्रत्येक फ्रेममध्ये त्याचा कसदार अभिनय पाहायला मिळाला. त्याची प्रत्येक भावना सहजनेते व्यक्त करण्याची क्षमता यामुळे त्याचा अभिनय यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरला.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, कुकी लोकांवर गोळीबार, तीन जण ठार

त्याच्यासह आयुष्मान खुराना आणि क्रिती सेनन यांच्या अभिनयाने देखील प्रेक्षकांना जिंकले. चित्रपटातील गाणे आजही प्रेक्षकांच्या ओठांवर रेंगाळताना दिसतात. तर चित्रपटातील राजकुमार राव, आयुष्मान खुराना आणि क्रिती सेनन यांचा दमदार अभिनयच या चित्रपटाचा मुख्य आकर्षण ठरलं. तर पंकज त्रिपाठी आणि सीमा पाहावा यांच्या देखील यामध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube