‘आम्ही डरपोकची भाषा दाखवून देऊ’; नितेश राणेंनी संजय राऊतांना घेरलं…

‘आम्ही डरपोकची भाषा दाखवून देऊ’; नितेश राणेंनी संजय राऊतांना घेरलं…

आम्ही तुम्हाला डरपोकची भाषा दाखवून देणार असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी घेरलं आहे. संजय राऊत यांनी भाजप डरपोक असल्याची टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवरुन नितेश राणे चांगलेच संतापले आहेत.

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अचानक स्थगित; रातोरात काढलं परिपत्रक

नितेश राणे म्हणाले, संजय राऊत म्हणतात, भाजप निवडणुका घेण्यास घाबरतं, कोण डरपोक आहे, हे आम्ही तुम्हाला दाखवून देणार असल्याचा नितेश राणे यांनी इशारा दिला आहे. तसेच डरपोक व्याख्या काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवून देणार असल्याचंही ते म्हणाल आहेत.

Sonu Sood : लॉकडाऊनमध्ये मी जीवनातील सर्वात महत्त्वाची भूमिका निभावली

संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी, फडणवीसांसह भाजपवर कोणत्या तोंडाने टीका करतात. सुजित पाटकरसोबत तुंमचं नात काय? याची माहिती द्या. कोविड काळात असंख्य कामगार मुंबईत होते. त्यांना आपल्या राज्यात पाठवण्याचा कार्यक्रम केंद्राच्या आदेशाने राज्य सरकार राबवत होतं. त्या कामगारांना खिचडीचं वाटप केलं, या लोकांनी त्यामध्येही भष्टाचार केला आहे तो पुढील काळात बाहेर येणारच, असल्याचं ते म्हणाले आहेत.

बीडमधील जुनी फळी शरद पवारांसोबतच! व्यासपीठावर माजी आमदारांची गर्दीच गर्दी

खिचडीच्या कंत्राटामध्ये मातोश्रीवाल्यांनी पैसे खाल्ले आहेत. हे लोकं खिचडीचे पैसे सोडत नाहीत आणि मोठमोठ्या बाता करतात, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी सिनेट निवडणूकीच्या मुद्द्यावरुनही मविआवर टीकेची तोफ डागली आहे.

राणे म्हणाले, सिनेटची निवडणूक रद्द झाल्यापासून थयथयाट सुरु आहे. या मुद्द्यावर आज पेंग्विन ठाकरेही बोलणार आहेत. ही निवडणूक आम्हालाही हवी होती. या लोकांना सिनेटमध्ये सत्ता कशाला हवी? नाईट लाईफ गॅंगचे 10 सदस्य सिनेटमध्ये होते. एका बाजूला विद्यार्थ्यांचं हित दाखवायचं अन् आपले काळे धंदे करायचे यासाठी पेंग्विन गॅंगला ही निवडणूक हवी असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube