Download App

Vikramaditya Motwane घेऊन येणार जवानांची शौर्यकथा, लवकरच चित्रपटाची घोषणा

Vikramaditya Motwane : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते त्याचबरोबर लेखक असणारे विक्रमादित्य मोटवानी (Vikramaditya Motwane) हे सध्या नौदलातील (navy ) जवानांच्या शौर्याच्या कथेवर काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. द ट्रायडेंट असे चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट नवदलाच्या जवानांच्या शौर्यावर आधारित असणार आहे.

लालू यादवांचा मोठा डाव : सत्ता कायम ठेवण्यासाठी थेट भाजपच्या मित्रपक्षालाच उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

तसेच या चित्रपटाची निर्मिती हे निखिल द्विवेदी करणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र या चित्रपटाची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारतीय नौदलाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी मिशन राहिलेल्या ऑपरेशन ट्रायडेंट यावरती हा चित्रपट आधारित असणार आहे. त्या युद्धामुळे 1971 च्या बांगलादेश युद्धाला कलाटणी मिळाली होती.

आज वाशीतच मुक्काम, पण रात्री GR न काढल्यास उद्या आझाद मैदान गाठणार : जरांगेंकडून अखेरची डेडलाईन

कारण यामध्ये भारतीय नौदलाच्या जवानांनी कराची बंदरावर बॉम्ब टाकले होते. नौदलाचे बब्रुभान यादव आणि एडमिरल नंदा यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन यशस्वी करण्यात आलं होतं. या ऑपरेशनवर आधारित असणारा विक्रमादित्य मोटवानी यांच्या या महत्त्वकांक्षी चित्रपटाचे प्री प्रोडक्शन काम सुरू झाला आहे. एप्रिल महिन्यापर्यंत या चित्रपटाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Maratha reservation : …तर ओबीसी समाजाचंही आंदोलन सुरू होईल; मंत्री छगन भुजबळांना सरकारला इशारा

विक्रमादित्य यांच्या इतर चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर 2023 मध्ये त्यांची वेब सिरीज जुबली आली होती. तिने देखील प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केले होते. यामध्ये अपारशक्ती खुराना, वामिका गब्बी, आदिती राव हैदरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सिरीज रिलीज करण्यात आली होती. तसेच सध्या मोटवानी हे त्यांच्या आगामी चित्रपट कंट्रोलमुळे चर्चेत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री अनन्य पांडे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालं आहे. लवकरच या चित्रपटाची देखील रिलीज डेट समोर येईल.

follow us

वेब स्टोरीज