Donald Trump Released Anti Tariff Cheating List : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 90 दिवसांच्या आयात शुल्कावरील बंदी लादल्यानंतर आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांनी नॉन-टेरिफ फसवणूकशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी 8 मुद्द्यांची यादी जाहीर केली आहे. ट्रम्प यांनी (America) म्हटलंय की, जर कोणत्याही देशाने नॉन-टॅरिफ फसवणूक केली तर त्या देशाचे अमेरिकेशी असलेले (Anti Tariff Cheating List) संबंध बिघडू शकतात. ट्रम्प यांच्या या नवीन इशाऱ्यामुळे अनेक देशांसाठी समस्या वाढू शकतात.
जगभरात व्यापार युद्धाचा धोका आधीच निर्माण झालाय. अशा परिस्थितीत, नॉन-टॅरिफ फसवणुकीची यादी आणखीन समस्या निर्माण करू शकते, असं म्हटलं जातंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘नॉन-टॅरिफ फ्रॉड’ यादी जाहीर (Reciprocal Tariff) केली. या यादीत चलन अवमूल्यन आणि ट्रान्सशिपिंग सारखे 8 मुद्दे समाविष्ट आहेत. ‘नॉन-टॅरिफ फ्रॉड’ लागू करणाऱ्या देशांना सोडले जाणार नाही, असा गंभीर इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय.
प्रत्येक पुरुषाचा फोटो काढा अन् घरच्यांना पाठवा; पिंक रिक्षा वाटपावेळी अजितदादांच्या ‘सेफ्टी टिप्स’
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, काही देश त्यांच्या बाजारपेठेत अमेरिकन उत्पादने महाग करण्यासाठी आणि अमेरिकेत त्यांची निर्यात स्पर्धात्मक ठेवण्यासाठी जाणूनबुजून त्यांच्या चलनांचे अवमूल्यन करतात. याशिवाय अनेक देश आयातीवर व्हॅट लावतात. कमी पैशात वस्तू टाकणे चुकीचे आहे. याशिवाय, निर्यातीवर कोणतेही सरकारी अनुदान नसावे, यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानच्या ‘बॉलिंग बॉल टेस्ट’चे उदाहरण दिलंय.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, किमतीपेक्षा कमी डंपिंग, निर्यातीवर सरकारी अनुदाने आणि शुल्क टाळण्यासाठी ट्रान्सशिपिंग हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी जपानच्या ‘बॉलिंग बॉल टेस्ट’चाही उल्लेख केला. जपानमध्ये अमेरिकन गाड्या विकल्या जाऊ नयेत म्हणून जपान ‘बॉलिंग बॉल टेस्ट’ची मदत घेतो. या प्रक्रियेदरम्यान 20 फूट उंचीवरून अमेरिकन कारवर बॉलिंग बॉल टाकले जातात. अशा परिस्थितीत, जर एखाद्या अमेरिकन कारच्या हुडवर डेंट असेल, तर ती कार जपानी बाजारात विकता येणार नाही. ही प्रक्रिया खूपच भयावह आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांवर लादलेला टॅरिफ 90 दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. ट्रम्प 75 हून अधिक देश अमेरिकेशी चर्चा करत आहेत. म्हणूनच त्यांनी 90 दिवसांसाठी शुल्कवाढ थांबवली आहे. या कालावधीत सर्व देशांवर फक्त 10 टक्के परस्पर शुल्क लागू असेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.