Download App

दक्षिण सीमेवर आणीबाणी, थर्ड जेंडर संपले; शपथविधीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या 13 मोठ्या घोषणा

Donald Trump 10 Decision After Oath Ceremony : डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. 40 वर्षात प्रथमच कॅपिटल हिलमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा (America President) शपथविधी सोहळा पार पडला. जेडी वन्स यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच दहा मोठे निर्णय घेतले आहेत.

“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन्..” भुजबळांनी सांगितलं पहाटेच्या शपथविधीवेळी काय घडलं?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी कार्यक्रमाला अब्जाधीश, उद्योगपती, त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्षांसह इतर मान्यवर उपस्थित होते. पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. अमेरिकेची दक्षिण सीमा मेक्सिको आहे. अमेरिकेला मेक्सिको सीमेवरून मोठ्या प्रमाणावर अवैध स्थलांतरितांच्या घुसखोरीचा सामना करावा लागतो.

शपथविधीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या 13 मोठ्या घोषणा

1. अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर
2. ‘मेक्सिकोमध्येच राहा’ धोरणाच्या अंमलबजावणीची घोषणा
3. थर्ड जेंडर संपवण्याची घोषणा
4. राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणीची घोषणा
5. भाषण स्वातंत्र्यासाठी अमेरिकेत सेन्सॉरशिपवर बंदी
6. पनामा कालवा पुन्हा ताब्यात घेण्याची योजना
7. गल्फ ऑफ मेक्सिकोचे नाव बदलण्याची घोषणा
8. इतर देशांवर शुल्क लादण्याची घोषणा
9. अमेरिका पॅरिस हवामान करारातून बाहेर पडणार
10. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना रद्द केली जाणार
11. WHO तून अमेरिका बाहेर पडणार
12. BRICS ला धमकी
13. TikTok ला 75 दिवसांचे अभय

ट्रम्प यांनी अमेरिकेला तेल आणि वायू उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि अमेरिकन नागरिकांसाठी ऊर्जा खर्च कमी करण्यासाठी ‘राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी’ घोषित करण्याची योजना जाहीर केलीय. ट्रम्प यांनी कॅपिटल रोटुंडा येथे अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ‘ड्रिल, बेबी ड्रिल’ची घोषणा केली. देशांतर्गत तेल उत्पादन वाढवून आणि ग्राहकांसाठी गॅसच्या किमती कमी करून अमेरिकेला ऊर्जा-निर्भर बनवण्याचे आश्वासन दिले.

अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का?, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या?

ट्रम्प यांनी घोषणा केलीय की, कोविड -19 लस आदेशामुळे सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या हजारो यूएस सैनिकांना ते पुन्हा कामावर ठेवणार आहेत. याप्रश्नी पहिल्याच दिवसांत कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अंदाजे 8,000 सैनिक मंडत अंतर्गत सैन्यातून काढून टाकण्यात आले. शपथ घेतल्यानंतर थोड्याच वेळात, ट्रम्प यांनी घोषणा केली की, ते एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करणार आहेत. ज्यामध्ये यूएस फेडरल सरकारने फक्त दोन लिंग ओळखले पाहिजेत – पुरुष आणि महिला.

 

follow us