“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन्..” भुजबळांनी सांगितलं पहाटेच्या शपथविधीवेळी काय घडलं?

“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन्..” भुजबळांनी सांगितलं पहाटेच्या शपथविधीवेळी काय घडलं?

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसांचे शिबीर नुकतेच शिर्डीत पार पडले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी या शिबिराला हजेरी लावली. अजितदादांच्या पाया पडलो, पहाटेची शपथ घेऊ नका असं त्यांना सांगितलं. पण दादा म्हणाले काही होत नाही. त्यांनी शपथ घेतली यानंतर त्यांना पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र सुरू झालं असा गौप्यस्फोट मुंडेंनी केला होता. यानंतर आता छगन भुजबळ यांनी खळबजनक वक्तव्य केलं आहे. पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं याचं उत्तर भुजबळांनी दिलं आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

राज्य सरकारने नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावर भुजबळ म्हणाले, काहीतरी अडचणी निर्माण झाल्या असतील त्यामुळे या निर्णयाला स्थगिती दिली असेल. मुख्यमंत्री दावोसवरून परत आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करतील आणि मार्ग काढतील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

अजितदादांच्या दोन शिलेदारांची फिल्डिंग अन् भुजबळ थेट शिर्डीत; नाराजी मात्र कायम

राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडे यांनी पहाटेचा शपथविधी म्हणजे एका षडयंत्राचा भाग होता असा उल्लेख केला होता. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, उद्धव ठाकरे तर असं षडयंत्र रचू शकत नाहीत. काँग्रेसचेही नेते रचू शकत नाहीत. मग कुणी रचलं?. हे षडयंत्र राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की भाजपाच्या लोकांनी रचलं? मला याबाबत माहिती नाही. पण मला इतकं आठवतं की 2019 मध्ये बैठका सुरू होत्या. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांत बैठका सुरू होत्या.

त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांच्यात थोडा वादही झाला होता. तेव्हा शरद पवार रागात निघून गेले होते. त्यानंतरही प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. नंतर आठ वाजता एक बैठक बोलावण्यात आली पण त्या बैठकीला अजित पवार हजर नव्हते. आम्हाला वाटलं की काही कामात असतील. पण दुसऱ्या दिवशी सकाळी टिव्ही लावला तेव्हा लक्षात आलं की अजित पवारांचा शपथविधी झाला आहे. मी तातडीने शरद पवारांकडे गेलो. नंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केला. आपण मजबुतीने राहिलं पाहिजे. जे काही झालंय ते होणार नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे असे शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले होते असे छगन भुजबळ म्हणाले.

Morning Oath Ceremony : पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कोणाचं? छगन भुजबळांनी थेट नावंच सांगितलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube