डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बदलले! इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर टॅरिफ लावणारच

Donald Trump Announce tariff On Electronic Items : अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) म्हटलंय की, आयात केलेल्या सेमीकंडक्टर चिप्सवर पुढील आठवड्यात शुल्क आकारले जाईल. चीनमधून आयात होणाऱ्या टॅरिफमधून स्मार्टफोन आणि संगणकांना वगळणे अल्पकालीन असेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. ट्रम्प म्हणाले की, त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगवेगळ्या टॅरिफ (tariff) बकेटमध्ये जात आहेत. आगामी […]

Donald Trump (1)

Donald Trump (1)

Donald Trump Announce tariff On Electronic Items : अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) म्हटलंय की, आयात केलेल्या सेमीकंडक्टर चिप्सवर पुढील आठवड्यात शुल्क आकारले जाईल. चीनमधून आयात होणाऱ्या टॅरिफमधून स्मार्टफोन आणि संगणकांना वगळणे अल्पकालीन असेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. ट्रम्प म्हणाले की, त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगवेगळ्या टॅरिफ (tariff) बकेटमध्ये जात आहेत.

आगामी राष्ट्रीय सुरक्षा शुल्क तपासणीमध्ये आम्ही सेमीकंडक्टर्स आणि संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळीवर एक नजर टाकत आहोत, असं देखील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. व्हाईट हाऊसने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (Trumps tariff) यांच्या परस्पर करातून काही इलेक्ट्रॉनिक वस्तू वगळण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर शेअर बाजाराने हिरवा कल दाखवला. जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया या देशांच्या टेक स्टॉक्समध्ये वाढ झाल्याचे वृत्त आहे.

Bogus Teachers Scam : धक्कादायक! नागपूरच्या खासगी शाळांत तब्बल 580 बोगस शिक्षक, शासकीय तिजोरीला कोट्यवधींचा चुना

व्हाईट हाऊसने टॅरिफ सवलतीची घोषणा केल्यानंतर चीन आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारासह तैवान टेक सप्लाय चेन स्टॉक्समध्ये तेजी आली, परंतु कदाचित ही तेजी अल्पकालीन असू शकते. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी रविवारी सांगितले की, चीनमधील महत्त्वाच्या तंत्रज्ञान उत्पादनांवर सेमीकंडक्टरसह स्वतंत्र नवीन शुल्क आकारले जाईल.

शुक्रवारी ट्रम्पच्या 145% च्या परस्पर शुल्काच्या प्रत्युत्तरात अमेरिकन आयातीवरील शुल्क 125% पर्यंत वाढवल्यानंतर बीजिंगने अमेरिकेवर जोरदार हल्ला केला. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की, वाघाच्या गळ्यातील घंटा फक्त तोच व्यक्ती सोडवू शकते, ज्याने ती बांधली आहे.

भाजप भाकरी फिरवणार! शेलारांच्या जागी मुंबई अध्यक्षपदासाठी 2 बड्या नेत्यांची नावं, कोणाची वर्णी?

गेल्या शुक्रवारी ट्रम्प प्रशासनाने काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर लादलेल्या शुल्कातून तात्पुरती सूट दिली होती. यामुळे अ‍ॅपलसारख्या मोठ्या टेक कंपन्यांना दिलासा मिळाला, कारण या कंपन्या परदेशातून आयात केलेल्या सुटे भाग आणि तयार उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. यूएस कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शनने काही वस्तूंना टॅरिफमधून सूट देण्याबाबत नोटीस जारी केली होती. याशिवाय, सेमीकंडक्टर बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीननाही सूट देण्यात आली. लुटनिक यांनी स्पष्ट केले की, ही सूट केवळ तात्पुरती आहे.

 

Exit mobile version