Download App

जगाला झटका देणाऱ्या ट्रम्पकडून दिलासा! ब्राझीलसह ‘या’ देशांवरील टॅरिफ घेतला मागे

Donald Trump हे जगातील देशांतील वस्तूंवर आयात शुल्क ( tarrif) लावत आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे.

Donald Trump back tarrif from Brazil Singpor and other Counry : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे (Donald Trump) हे जगातील देशांतील वस्तूंवर आयात शुल्क ( tarrif) लावत आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. भारत आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर (रेसिप्रोकल टॅरिफ) लावला आहे. भारतावर 27 टक्के, तर चीनवर 34 टक्के अतिरिक्त कर लावलाय. मात्र यामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेकडून ब्राझीलसह अनेक देशांवरील टॅरिफ मागे घेतला आहे.

मोठी बातमी, माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा मारेकरी पंजाब पोलिसांच्या अटकेत

न्यूज एजन्सी रायटर्सच्यानुसार ब्राझील ही अशी अर्थव्यवस्था ठरली आहे. जी दहा टक्क्यांहून कमी टॅरिफ असणारी अमेरिकेला निर्यात करणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे ब्राझील आदेश अमेरिकेच्या कडक टॅरिफ धोरणापासून वाचला आहे. त्याचबरोबर अमेरिकेकडून मोरक्को, तुर्की आणि सिंगापूर या देशांना देखील अमेरिकेसोबत व्यापारी नुकसान झालं आहे. दुसरीकडे बांगलादेश आणि व्हिएतनाम सारखे देश संकटात सापडले आहेत. मात्र मिश्र हा एक असा देश आहे. ज्याच्यावर अमेरिकेने टॅरिफ लावलेला नाही. दुसरीकडे तुर्की या देशाला देखील चांगला फायदा झाला आहे कारण अमेरिकेने तुर्कीला लावलेला टेरेस हा इतर अनेक देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे या देशांना दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘महाराष्ट्र महोत्सव’ ; सुनिल तटकरे

काही मीडिया रिपोर्टनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता 90 दिवसांसाठी सर्व देशांवरील टॅरिफ कर थांबवण्याचा विचार केला आहे. मात्र व्हाईट हाऊसकडून अद्याप या बातमीची पुष्टी करण्यात आलेली नाही. क्या पॅरिस धोरणाबाबत बोलताना ट्रम्प यांचं म्हणणं आहे की, जागतिक व्यापाराला व्यवस्थित करण्यासाठी घरगुती उत्पादन बनवणे गरजेचे आहे. तसेच चीन हा देश धोकेबाज देश आहे.

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू, रायगड प्रकरणात सुनिल तटकरे भडकले

दोन आठवड्यांपूर्वी वीस टक्के आयात शुल्क लावले होते. त्यामुळे आता चीनच्या वस्तूंवर अमेरिकेने 54 टक्के कर लावला आहे. त्यामुळे चीनच्या वस्तू अमेरिकेत महाग होणार आहे. त्याचा फटका चीनच्या उत्पादनाला बसणार आहे. आता चीनने ही अमेरिकेचे (America) टॅरिफ हत्यार त्यांच्यावर उगरले आहे. चीनने अमेरिकेवर 34 टक्के आयात शुल्क लादले आहे. या निर्णयापूर्वी गुरुवारी या आयात शुल्क युद्धामुळे अमेरिकेचे बाजार जोरदार कोसळले आहेत. त्यात आणखी घसरण होऊन अमेरिकेचा शेअर बाजारात मंदीचा धोका आहे.

follow us