FATF blacklists North Korea, Iran and Myanmar for Terrorism funding and money laundering : जागतिक स्तरावरील दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रींगवर नजर ठेवणारी संस्था FATF ने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. यामध्ये त्यांनी उत्तर कोरिया, इराण आणि म्यानमार या देशांना अद्याप देखील जोखिम असणारे देश म्हटलं आहे. कारण हे देश दहशतवादाला फंडिंग अन् मनी लॉन्ड्रींग विरोधी कायदे करण्यात अयशस्वी ठरले आहेत.
Phaltan Case : मृत डॉक्टर तरुणीने ज्यांच्याकडे तक्रार केली होती ते डॉ. धुमाळ काय म्हणाले?
त्यामुळे हे देश जागतिक पातळीवर धोक्याचे ठरत आहेत. त्यामुळे या देशांना ब्लॅक लिस्टमधून काढलं जावू शकत नाही. आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांनी त्यांच्यापासून सावध रहावे. या देशांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे की, आता आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांनी त्यांना मर्यादित कर्ज आणि आर्थिक सहाय्यता द्यावी. जेणेकरून या देशांवर FATF नियमांना पाळण्याचा दबाव निर्माण होईल.
मोहोळ खोटारडे, जमीन चोरांची प्रकरणं घेऊन लवकरच भेटुया; धंगेकरांचा मोहोळांना इशारा
FATF ने 2025 मध्ये अनेक देशांची समिक्षा केली आहे. ज्यामध्ये अल्जेरिया, अंगोला, बुल्गेरिया, बुर्किना फासो, कॅमेरून, कोट डी आयवर, कांगो लोकतांत्रिक गणराज्य, कोन्या, लाओ पीडीआर, मोनाको, मोजांबिक, नामिबिया, नेपाळ, नायजेरिया, दक्षिण अफ्रिका, दक्षिण सूदान, सिरीया, व्हेनेझुएला आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. यामध्ये बुर्किना फासो, मोजांबिक, नामीबिया और दक्षिण अफ्रीका. यांना ग्रे लिस्टमधून काढण्यात आलं आहे.
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मित्राच्या फार्म हाऊसहून दुसरा आरोपी बनकर अटकेत
म्यानमारला 2022 च्या ऑक्टोबरमध्ये ब्लॅकलिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. कारण हा देश दहशतवादाला फंडिंग अन् मनी लॉन्ड्रींग विरोधी कायदे करण्यात अयशस्वी ठरला. तसेच 2025 च्या ऑक्टोबरमध्ये देखील त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना ब्लॅकलिस्टमधून काढण्यात आलेले नाही. त्याविरोधात कठोर पाऊल उचललं जाऊ शकतं.
राज्यात पुढील 2 दिवस पुन्हा पाऊस! मुंबईसह मराठवाडा, उ. महाराष्ट्राला येलो अलर्ट
तर इराणने 2018 पासून FATF च्या नियमांचं पालन केलेलं नाही. 2025 च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादाला मिळणाऱ्या फंडिंग विरोधी कायदा पास केला मात्र FATF चं म्हणणं आहे की, अद्यापही त्यांच्याकडे काही कमतरता आहेत.
