Download App

‘हमास म्हणजे आधुनिक काळातील नाझी, गेल्या 16 वर्षांपासून पॅलेस्टिनींवर अत्याचार’

Israel Hamas War: गेल्या काही दिवसांपासून हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आणखी तीव्र झाले आहे. यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. युद्ध थांबावं यासाठी सर्वच देशांनी आवाहन केले आहे. मात्र इस्रायलने हमासवर गंभीर आरोप लावले आहेत. गाझातील हमास हा आधुनिक काळातील नाझी आहे. या दहशतवादी गटाला युद्ध विराम नको आहे. ज्यू लोकांचा नाश करण्यात त्यांना रस आहे.’ असे संयुक्त राष्ट्रात इस्रायलचे स्थायी प्रतिनिधी गिलाड एर्डन यांनी म्हटले.

हमासला ज्यू लोकांचा नाश करण्यात रस
इस्रायल-हमास युद्धाबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीला संबोधित करताना गिलाड एर्डन म्हणाले की, हमास हा आधुनिक काळातील नाझी आहे. हमास संघर्षावर तोडगा शोधत नाही. त्यांना संभाषणात रस नाही. ज्यू लोकांचा नाश करणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे.

16 वर्षांपासून हमासकडून पॅलेस्टिनींवर अत्याचार
एर्डन म्हणाले, नाझीवादाच्या उदयाप्रमाणेच जगाने हमासवर मौन बाळगले आहे. हमास गेल्या 16 वर्षांपासून पॅलेस्टिनींवर अत्याचार करत आहे. 2007 मध्ये जेव्हा त्यांनी गाझामध्ये सत्ता घेतली तेव्हा त्यांनी शेकडो पॅलेस्टिनींना ठार केले.

Maratha Reservation : आंदोलनाला बळ! मंत्रालयाबाहेर 3 आमदारांचं उपोषण

आंदोलन करणाऱ्यांची हत्या झाली
युनायटेड नेशन्समधील इस्रायलचे स्थायी प्रतिनिधी म्हणाले की हमास हे नाझी आहेत. त्यांनी गाझावर गेली 16 वर्षे राज्य केले आहे. या 16 वर्षांत त्यांनी पॅलेस्टिनींशी गैरवर्तन केले आणि त्यांना विरोध करणाऱ्यांना ठार मारले.

हमासने पॅलेस्टिनींना ढाल म्हणून वापरले
एर्डन म्हणाले की, हमासने पॅलेस्टिनींचा मानवी ढाल म्हणून वापर केला, रुग्णालयांच्या खाली दहशतवादी तळ बांधले आणि शाळांच्या शेजारी क्षेपणास्त्र प्रक्षेपक बांधले. तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करता?

Sanjay Raut : अजितदादांना राजकीय डेंग्यू, फडणवीसांनी राजीनामा द्यावा; राऊतांचा हल्लाबोल

हमासचे नेते गाझा पट्टीत राहत नाहीत
एर्डन म्हणाले की, हमास गाझातील लोकांना युद्धक्षेत्र सोडू देत नाही. त्याचे नेते दोहा आणि इस्तंबूलमध्ये चैनीत राहतात. ते गाझा पट्टीतही राहत नाहीत. आज निष्पाप ज्यू अर्भकांना जिवंत जाळल्याबद्दलही ही परिषद मौन बाळगून आहे.

Tags

follow us