Paris Olympics 2024 : भारताची 29 वर्षीय टेबल टेनिस स्टार खेळाडू मनिका बत्राने इतिहास रचला आहे. (Paris Olympics) मनिकाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या टेबल टेनिस स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक इतिहासात अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
इतकी वर्ष नेतृत्व करेल असं वाटलं नव्हत भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाची निवृत्तीची घोषणा
मनिकाने महिला एकेरीच्या राउंड ऑफ 32 सामन्यात शानदार सुरुवात केली. मनिकाने फ्रान्स खेळाडूचा 11-9, 11-6, 11-9, 11-7 असा पराभव केला. तिने फ्रान्स खेळाडूवर 4-0 ने विजय मिळवला आणि 16 फेरी गाठली. मनिकाने यापूर्वी 64 च्या फेरीत ग्रेट ब्रिटनच्या ॲना हर्सीचा पराभव केला होता, ज्यामध्ये तिने फक्त एक सेट गमावला होता. 32 च्या फेरीत मनिकाचा पुढील सामना हाँगकाँगच्या झू सी आणि जपानच्या एम हिरानो यांच्याशी होईल.
2024 पॅरिस ऑलिम्पिकमधील टेबल टेनिस महिला एकेरीच्या 32 व्या फेरीत 12व्या मानांकित प्रितिका पावडेला पराभूत करून मनिकाने इतिहासाच्या पानांमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे.1988 पासून टेबल टेनिस स्पर्धात ऑलिंपिकमध्ये चीनच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं आहे. त्यांनी 37 स्पर्धांमध्ये एकूण 60 पदके जिंकली. त्यामुळे मनिका बत्रा यावेळी चीनी साम्राज्य मोडून काढणार का? यांची उत्सुकता लागली आहे.
भारतात व्हॉट्सअप बंद होणार? मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं..
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे ध्वजवाहक अचंता शरथ कमल आणि हरमीत देसाई यांना चांगली कामगिरी करता आली नाही. दोन्ही खेळाडू पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. पुरुष एकेरीत अचंता शरथ कमल आणि हरमीत देसाई 16 च्या फेरीत बाहेर पडले. त्याचबरोबर महिला एकेरीत श्रीजा अकुला चांगली कामगिरी करत आहे. श्रीजाचा पुढील सामना मंगळवारी (३० जुलै) 32 च्या फेरीत सिंगापूरच्या झेंग जियानशी होणार आहे.