भारतात व्हॉट्सअप बंद होणार? मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं..
WhatsApp Service in India : सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप जगभरात प्रसिद्ध (WhatsApp Service in India) आहे. भारतात तर आजमितीस कोट्यावधी लोक व्हॉट्सअप वापरतात. व्हॉट्सअपशिवाय काम करणे आज तरी अशक्य आहे. अशा परिस्थितीत भारतातून व्हॉट्सअप बंद होणार का, अशा चर्चा सातत्याने ऐकू येत आहेत. या चर्चा खऱ्या आहेत का? यामध्ये काही तथ्य आहे का किंवा सरकारकडे याबाबत काही माहिती आहे का ? याचा खुलासा सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी (Ashwini Vaishnav) दिली. मेटाने भारतात व्हॉट्सअप सेवा (WhatsApp) बंद करण्याची कोणतीही माहिती सरकारला दिलेली नाही अशी माहिती मंत्री वैष्णव यांनी दिली.
WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी, आपोआप क्लिअर होणार Unread मेसेज
देशातील व्हॉट्अप वापरकर्त्यांची माहिती देण्याच्या सूचना मान्य करण्यास नकार दिल्याने व्हॉट्सअप भारततील सेवा बंद करणार आहे का असा प्रश्न काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. कंपनीने भारत सरकारला अजून तरी कोणतीच माहिती दिलेली नाही असे वैष्णव यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियाशी संबंधित सरकारी निर्देश राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी दिले गेले आहेत. हे नियम देशाची सुरक्षा आणि अन्य देशांशी चांगले संबंध कायम ठेवण्यासाठी आहेत असे मंत्री वैष्णव यांनी सांगितले.
मेटा कंपनीचे सीईओ मार्क जुकरबर्गने मेसेजिंग टेक्नॉलॉजीचा अंगीकार केला म्हणून भारताचे कौतुक केले होते. भारत या क्षेत्रात जागतिक लीडर आहे. भारतातील कोट्यावधी वापरकर्त्यांमुळे हा देश व्हॉट्सअपचा सर्वात मोठा बाजार आहे असे जुकरबर्गने सांगितले होते. यानंतरही भारतातून व्हॉट्सअप बंद होणार असल्याच्या चर्चा अधूनमधून ऐकू येत असतात.
मोठी बातमी! ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार नाही व्हॉट्सॲप, पहा संपूर्ण लिस्ट
..तर आम्ही भारतात काम बंद करू
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सअपने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले होते की जर कंपनीला मेसेजेसच्या एन्क्रिप्शला तोडण्यास बाध्य करण्यात आले तर भारतात काम बंद करू. कंपनीच्या या पवित्र्यामुळे युजर्सचे टेन्शन वाढले होते. भारत सरकारने तयार केलेल्या नव्या नियमांना हे सरळसरळ आव्हान होते. सरकारचे हे नियम गोपनियतेच्या अधिकाराचे उल्लंघन करतात असे कंपनीने म्हटले होते.