केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा स्वदेशीचा संदेश ! मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटऐवजी ‘झोहो’तून सादरीकरण

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट सोडून सादरीकरणासाठी भारतीय बनावटीचे सॉफ्टवेअर झोहो वापरले.

Ashwini Vaishnav Used Swadeshi Software Zoho

Ashwini Vaishnav Used Swadeshi Software Zoho for Presentations : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट सोडून त्यांच्या सादरीकरणासाठी भारतीय बनावटीचे ‘स्वदेशी’ सॉफ्टवेअर झोहो वापरले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ आकारणी करूत दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताने झुकण्यास नकार दिला. ट्रम्पच्या कर आकारणी दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मायक्रोसॉफ्टला निरोप देत सर्व भारतीयांना स्वदेशी उत्पादने आणि सेवा स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशीच्या आवाहनात सामील होण्याचे आवाहन केलंय.

स्वदेशीचा संदेश

यासंबंधी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा (Ashwini Vaishnav) एक व्हिडिओ देखील समोर आलाय. ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, मी झोहोकडे वळत आहे – कागदपत्रे, स्प्रेडशीट आणि सादरीकरणांसाठी आमचे स्वतःचे स्वदेशी (Software Zoho) व्यासपीठ. मी सर्वांना स्वदेशी उत्पादने आणि सेवा स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) स्वदेशी आवाहनात सामील होण्याचे आवाहन करतो.”

भारत सरकारकडून ‘एक राष्ट्र, एक कर’

‘आत्मनिर्भर भारत’ या दिशेने भारत सरकारच्या वाढत्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांचे हे विधान आलंय. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या भेटीदरम्यान अरुणाचल प्रदेशातील व्यापारी आणि व्यावसायिकांशी संवाद साधला. अरुणाचल प्रदेशातील स्थानिक व्यापाऱ्यांनी आठवण करून दिली की, पूर्वी त्यांना अनेक करांना तोंड द्यावे लागत होते, परंतु पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने जीएसटीद्वारे ‘एक राष्ट्र, एक कर’ ही ऐतिहासिक सुधारणा लागू केली.

PM मोदींच्या स्वदेशी मोहिमेला झोहोने दिला चालना

1996 मध्ये चेन्नई येथे स्थापन झालेली, झोहो ही भारतात खोलवर रुजलेली जागतिक सॉफ्टवेअर कंपनी म्हणून हळूहळू विकसित झाली आहे. ती आघाडीच्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करते, व्यवसाय, शैक्षणिक संस्था आणि सरकारी विभागांच्या गरजांनुसार दस्तऐवज निर्मिती, स्प्रेडशीट व्यवस्थापन आणि सादरीकरण साधने प्रदान करते.

झोहो म्हणजे काय?

झोहो ही एक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे, जी क्लाउड-आधारित व्यवसाय सॉफ्टवेअर आणि वेब-आधारित साधनांचा एक व्यापक संच प्रदान करते. हे प्लॅटफॉर्म फ्रीलांसर आणि स्टार्टअप्सपासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत सर्व आकारांच्या व्यवसायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. झोहोच्या विस्तृत वैशिष्ट्यांमुळे कंपन्यांना त्यांचे कामकाज सुलभ करण्यास, ग्राहक संबंध मजबूत करण्यास आणि असंख्य व्यवसाय प्रक्रिया स्वयंचलित करण्यास सक्षम करते.

follow us