Russia North Korea : रशिया युक्रेन युद्धामुळे जगभरात मोठा तणाव निर्माण (Russia Ukraine War) झालेला असतानाच आणखी एक टेन्शन देणारी बातमी आली आहे. ज्यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) सध्या उत्तर कोरिया दौऱ्यावर आहेत. येथे उत्तर कोरिया आणि रशियामध्ये एक करार (Russia North Korea) करण्यात आला आहे. या करारानुसार युद्धाच्या परिस्थितीत दोन्ही देश एकमेकांच्या मदतीसाठी धावून जातील. उत्तर कोरियाच्या सरकारी मीडियाने या कराराची खात्री केली आहे.
मीडिया रिपोर्ट्स नुसार दोन्ही देशांदरम्यान व्यापक रणनीतीक करारावर बुधवारी राजधानी प्योंगयांगमध्ये आयोजित शिखर संमेलनात सही करण्यात आली. दोन्ही देशांत झालेल्या या करारातील परिच्छेद चार नुसार जर एका देशावर हल्ला झाला किंवा हा देश युद्धाच्या परिस्थितीत असेल तरीही दुसरा देश सैन्य आणि अन्य मदत करील. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर रशिया आणि उत्तर कोरियामध्ये झालेला हा सर्वात महत्त्वाचा करार आहे.
रशिया आणि उत्तर कोरिया या देशात हा करार अशा वेळी झाला आहे जेव्हा अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांनी रशिया युक्रेन युद्धात उत्तर कोरियाने रशियाला मदत केली म्हणून चिंता व्यक्त केली आहे. रशियाच्या आर्थिक आणि तांत्रिक मदतीने उत्तर कोरिया परमाणू हत्यारे आणि मिसाईल प्रोजेक्टला वेग देऊ शकतो अशीही भीती अमेरिकेला वाटत आहे.
तर दुसरीकडे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने (Kim Jong Un) युक्रेन युद्धात रशियाला पूर्ण पाठींबा (Ukraine War) देणार असल्याचे म्हटले आहे. हा करार एतिहासिक असल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे. याआधी सन 1961 मध्ये उत्तर कोरिया आणि सोव्हिएत संघ यांच्यात असाच एक करार झाला होता. या करारात सुद्धा युद्धाच्या प्रसंगात दोन्ही देश एकमेकांची मदत करणार असल्याचे म्हटले होते. नंतर जेव्हा सोव्हिएत संघाचे पतन झाले तेव्हा हा करार सुद्धा संपुष्टात आला. यानंतर सन 2000 मध्ये पुन्हा दुसरा करार करण्यात आला. मात्र या करारात सैन्य मदतीची अनिवार्यता काढून टाकण्यात आली होती. आता जो करार झाला आहे त्यात सैन्य मदतीचा मुद्दा पुन्हा समाविष्ट करण्यात आला आहे.
South Korea : धक्कादायक! पत्रकार परिषदेतच विरोधी नेत्यावर चाकूहल्ला; दक्षिण कोरियात काय घडलं?
दरम्यान, या करारावर दक्षिण कोरियाने (South Korea) सध्या तरी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यात तणाव प्रचंड वाढला आहे. उत्तर कोरिया सातत्याने परमाणू हत्यारांचे परीक्षण करण्यात गुंतला आहे तर दक्षिण कोरियाही अमेरिका, जपान यांच्या बरोबर संयुक्त सैन्य अभ्यास करून उत्तर कोरियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.