Oil And Energy Supplies To India From Russia : भारत-रशिया संबंधांना ( Russia And India) नव्या उंचीवर नेण्यासाठी मॉस्को येथे बैठक पार पडली. या 26 व्या आंतर-सरकारी आयोगाच्या बैठकीत ऊर्जा, व्यापार, अणुऊर्जा (Oil And Energy) आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यावर सखोल चर्चा झाली. अमेरिकेने भारतावर रशियन तेल खरेदीसाठी 25 टक्के टॅरिफ लादल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. मॉस्को येथे झालेल्या 26 व्या बैठकीत दोन्ही देशांदरम्यान व्यापार, ऊर्जा आणि वैज्ञानिक-तांत्रिक क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर (Jaishankar And Manturov) भर देण्यात आला.
ऊर्जा साधनांचा पुरवठा
रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव यांनी सांगितले की, रशियातून भारताकडे कच्चे तेल, तेल उत्पादने, तापीय कोळसा आणि इतर ऊर्जा साधनांचा पुरवठा सुरु आहे. रशियन द्रवित नैसर्गिक वायू (LNG) भारतात निर्यात करण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा अमेरिकेने भारतावर रशियाकडून तेल खरेदीवर 25 टक्के टॅरिफ लागू केले आहे.
हुश्श! आजपासून पावसाचा जोर ओसरणार; कशी असणार पावसाची स्थिती, जाणून घ्या
नवे प्रकल्प हाती घेण्याची तयारी
भारतीय बाजूने या बैठकीची सह-अध्यक्षता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केली. ते सध्या तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. मंटुरोव यांनी पुढे सांगितले की – शांततामय अणुउद्योग क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची अपेक्षा आहे. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या अनुभवाच्या आधारावर आणखी नवे प्रकल्प हाती घेण्याची तयारी आहे. भारत-रशिया यांच्यातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार आता स्थानिक चलनात (राष्ट्रीय चलनांमध्ये) होत आहेत.
आता ‘वेल्हे’ नाही ‘राजगड’ म्हणायचं, फडणवीस सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब, केंद्र सरकारची मंजुरी
बैठकीच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या
बैठकीनंतर जयशंकर यांनी सोशल मीडियावर लिहिले की, व्यापार, ऊर्जा, उद्योग, कृषी, कौशल्य विकास, शिक्षण, गतिशीलता आणि सांस्कृतिक सहकार्य अशा विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली. आगामी भारत-रशिया शिखर परिषदेसाठी ही बैठक महत्वाची ठरेल आणि आमची भागीदारी अधिक मजबूत करेल. जयशंकर आणि मंटुरोव यांनी या बैठकीच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या केल्या असून त्याचे तपशील भारत आणि रशिया सरकार लवकरच जाहीर करणार आहेत.