आता ‘वेल्हे’ नाही ‘राजगड’ म्हणायचं, फडणवीस सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब, केंद्र सरकारची मंजुरी

आता ‘वेल्हे’ नाही ‘राजगड’ म्हणायचं, फडणवीस सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब, केंद्र सरकारची मंजुरी

Pune News : राज्यातील महायुती सरकारच्या काळात काही शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. या यादीत आता आणखी एका तालुक्याची भर पडली आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव बदलले आहे. आता वेल्हे तालुका ‘राजगड’ या नावाने ओळखला जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. राजगड या नावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. आता राज्य सरकार लवकरच राजपत्र प्रसिद्ध करणार आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे त्यामुळे या तालुक्याचे नाव राजगड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तालुक्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. वेल्हे तालुक्यातील 58 ग्रामपंचायती आणि पुणे जिल्हा परिषदेने तालुक्याच्या नावात बदल करण्याचा ठराव मंजूर केला होता. या ठरावाला महसूल विभागानेही मंजुरी दिली.

खडकवासला धरणातून मोठा विसर्ग, पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद…

वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांकडून तालुक्याचं नाव बदलण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत राजगड नावाची शिफारस मंजूर करण्यात आली. पुणे विभागीय आयुक्तांकडून 5 मे 2022 रोजी प्रस्ताव तयार करून घेण्यात आला होता. यानंतर पुढील टप्प्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तालुक्याच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता वेल्हे तालु्क्याच्या राजगड या नावाला केंद्र सरकारनेही मंजुरी दिली आहे. यानंतर आता राज्य सरकार राजपत्र प्रसिद्ध करणार आहे.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube