Download App

Video: प्रिय मित्र, वेलकम; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून दिलखूलास स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची रात्री त्यांच्या निवास्थानी भेट घेतली.

PM Modi Russia visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची त्यांनी रात्री मॉस्कोजवळील रशियन राष्ट्राध्यक्षांच्या नोवो-ओगार्योवो निवासस्थानी भेट घेतली. (PM Modi) रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या एक्स (ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पीएम मोदी यांचे व्लादिमीर पुतिन स्वागत करत असल्याचं दिसत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; ५ जवान शहीद, ‘या’ संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी

पुतिन यांनी पीएम मोदी रशिया दौऱ्यावर आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. म्हणाले, ‘प्रिय मित्र, तुमचं स्वागत आहे. तुम्हाला पाहून मला खरोखर आनंद झाला आहे. पंतप्रधान मोदी रात्रीच्या जेवणासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचल्यावर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांचे जोरदार स्वागत केलं. रात्रीच्या जेवणानंतर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना गोल्फ कार्टमध्ये बसवलं आणि सरकारी निवासस्थानात फेरफटका मारला. यादरम्यान पुतिन यांनी स्वत: गोल्फ कार्ट चालवली.

विधानसभेसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार जाहीर, म्हणाले,सुमनताईनंतर आता रोहितला साथ द्या

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच रशिया दौरा आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी शिखर चर्चेसाठी पंतप्रधान मोदी सोमवारी रशियाला पोहोचले. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याकडे व्यापक भू-राजकीय संदर्भ आणि संकेत म्हणून पाहिले जात आहे.

 

follow us