Lockdown in Pakistan : आर्थिक कंगालीने हैराण झालेल्या पाकिस्तानात शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO Summit) संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या आयोजनाची सर्व तयारी पाकिस्तान सरकारने (Pakistan News) पूर्ण केली आहे. या परिषदे दरम्यान देशात काहीच गडबड होऊ नये यासाठी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. पाकिस्तानच्या राजधानीचे शहर आणि रावळपिंडी या दोन शहरात 16 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. या अंतर्गत मॅरेज हॉल, कॅफे, रेस्टॉरंट, स्नूकर क्लब बंद आहेत.
पाकिस्तानात पोलीस प्रशासनाने या दोन शहरातील मॅरेज हॉल, कॅफे, रेस्टॉरंट 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील व्यापारी, हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना नोटिसा पाठवल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा या नोटीसित देण्यात आला आहे.
इस्त्राइलला मिळालं ‘ब्रम्हास्त्र’; अमेरिकेकडून THAAD मिसाईलची घोषणा…
दरम्यान येत्या 16 ते 17 ऑक्टोबर दरम्यान संमेलन होणार आहे. या काळात विवाह सोहळे, समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम नागरिकांना आयोजित करता येणार नाहीत. प्रशासनाकडून यासाठी कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. या परिषदेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना सरकारकडून केल्या जात आहेत. या परिषदेत भारतीय परराष्ट्र मंत्री, चीनचे पंतप्रधान यांच्यासह अन्य देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
पाकिस्तान सरकारने सुरक्षिततेची सर्व जबाबदारी सैन्यावर सोपवली आहे. स्थानिक पोलीस प्रशासन आणि अन्य सुरक्षा दलाना सैन्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दोन शहरांत दहा हजारांपेक्षा जास्त सैनिक आणि कमांडो तैनात करण्यात आले आहेत. यातच देशाचे माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इंसाफ पक्षाने पुढील चार दिवसांत देशात विविध ठिकाणी विरोध प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. याच कारणामुळे सर्वकाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोठी बातमी : जपानी संस्था ‘निहोन हिडांक्यो’ ला 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर
हेही वाचा :
China : चीनचा नवा जीएसआय उद्योग, पाकिस्तानची चांदी; भारताला मात्र धोक्याची घंटा
Pakistan : पाकिस्तान सरकारला धक्का! जुन्या मित्राने नाकारली मोठी ऑफर?
Pakistan : सरकारी कार्यक्रमात रेड कार्पेट बंद; खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तानचा निर्णय