Download App

आंघोळ करताना ‘या’ चुका टाळा, अन्यथा महागात पडू शकते

Women Should Have Avoid These mistakes while bathing : आंघोळ केल्याने केवळ शरीरच स्वच्छ होत नाही तर मनही (Bathing Tips) स्वच्छ होते. प्राचीन काळी याबद्दल एक म्हण सांगितली जात होती. आंघोळ केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते, म्हणूनच आंघोळ करणे (Health Tips) आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.आपण जितके स्वच्छ राहतो तितके आजारी पडण्याची शक्यता कमी असते. आपण सर्वजण आंघोळ (Bathing) करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेत नाही, त्यामुळे आरोग्याचे खूप नुकसान होते.

महिला अनेकदा आंघोळ करताना काही सामान्य चुका करतात. त्यामुळे त्यांची त्वचाच खराब होत नाही, तर आरोग्यावर देखील परिणाम होतो. म्हणून, या छोट्या चुका करणे टाळले पाहिजे. महिलांनी त्वचा खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आंघोळ करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.

नवविवाहित लेफ्टनंट नरवाल यांच्या हनीमून यात्रेचा दर्दनाक अंत, प्लॅन होता यूरोपचा पण…

गरम पाण्याने आंघोळ

खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचा नैसर्गिक ओलावा निघून जातो, यामुळे त्वचेवर खाज सुटते आणि कोरडेपणा जाणवतो. यासोबतच त्वचेवर अकाली सुरकुत्या दिसू लागतात. म्हणून, खूप गरम पाण्याने आंघोळ करणे टाळणे, महिलांसाठी फायदेशीर ठरते.

वारंवार साबण लावणे

जास्त साबण लावल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. यामुळे त्वचा कोरडी आणि संवेदनशील होऊ शकते. म्हणून, जास्त साबण वापरू नका.

यशराज रिसर्च फाऊंडेशनचं कार्य कौतुकास्पद; राज्यपाल राधाकृष्णन यांनी थोपटली पाठ

ओले केस विंचरणे

ओले केस खूप कमकुवत असतात आणि ते लगेचच विंचारल्याने अधिक तुटू शकतात. म्हणून, कधीही ओले केस विंचरू नका. यामुळे केस गळतीची समस्या वाढू शकते.

ओले टॉवेल वापरणे

ओला टॉवेल वापरल्याने बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. कारण अशा टॉवेलमध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात, यामुळे त्वचेवर संसर्ग पसरू शकतो. यामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका देखील वाढतो.

दररोज केस धुणे

काही महिला दररोज केसांना शाम्पू लावतात, त्यामुळे त्यांचे केस खूप कोरडे होतात. त्याच वेळी, केसांची नैसर्गिक चमक कमी होऊ लागते. म्हणून, आठवड्यातून फक्त 2 किंवा 3 वेळाच केस धुण्याचा प्रयत्न करा.

टीप : वरील लेख केवळ माहितीस्तव आहे. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

follow us