यशराज रिसर्च फाऊंडेशनचं कार्य कौतुकास्पद; राज्यपाल राधाकृष्णन यांनी थोपटली पाठ

यशराज रिसर्च फाऊंडेशनचं कार्य कौतुकास्पद; राज्यपाल राधाकृष्णन यांनी थोपटली पाठ

Mumbai News : भ्रष्टाचाराचा फटका श्रीमंतांपेक्षा गरिबांना अधिक बसतो हे वास्तव आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करणे आवश्यक आहे असे सांगून समाजाने सुशासन व नीतिमूल्यांचा पुरस्कार केल्यास खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन घडेल, असे प्रतिपादन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते आरोग्यसेवा, शाश्वत विकास व सुशासन या क्षेत्रात मूलभूत स्तरावर कार्य करणाऱ्या देशातील तीन सेवाभावी संस्थांना तिसरे ‘यशराज भारती सन्मान’ मुंबई येथे प्रदान करण्यात आले.

यशराज रिसर्च फाऊंडेशन या संस्थेने प्रसिद्धीपासून दूर मूलभूत स्तरावर कार्य करणाऱ्या आरोग्य, शाश्वत विकास व सुशासन या विषयात कार्य करणाऱ्या संस्थांना पुरस्कारासाठी निवडल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ८ ते ९ टक्के इतकी असून राज्यातील सेवाभावी डॉक्टरांनी तसेच विशेषज्ञांनी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आदिवासी भागातील बांधवांपर्यंत पोहोचवाव्यात. या संदर्भात राज्यपाल राधाकृष्णन यांनी छत्तीसगड येथील ‘जन स्वास्थ्य सहयोग’ या संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

आज राज्यातील शाळांची संख्या फार मोठी असली तरी देखील शिक्षणाचा दर्जा घटत आहे. शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे विशषतः मुलींचे शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यांचा उच्च शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांमार्फत आपण ‘शाळा संपर्क’ अभियान राबवले जात असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

सुरांच्या अबोल भावनांना आवाज देणाऱ्या गायिका के. एस. चित्रा यांचं “माझी प्रारतना”तलं पहिलं गाणं प्रदर्शित

विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी एकलव्य आदर्श शाळांना भेटी द्याव्या तसेच तेथे शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यास प्रोत्साहित करावे या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व वसतिगृह सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यशराज रिसर्च फाऊंडेशन या संस्थेने प्रसिद्धीपासून दूर मूलभूत स्तरावर कार्य करणाऱ्या आरोग्य, शाश्वत विकास व सुशासन या विषयात कार्य करणाऱ्या संस्थांना पुरस्कारासाठी निवडल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.

छत्तीसगड येथील ‘जन स्वास्थ्य सहयोग’ या संस्थेला आदिवासातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टर्सच्या मदतीने घरपोच आरोग्य सेवा दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले तर शिक्षण क्षेत्रातील ‘प्रथम एजुकेशन फाऊंडेशन’ या संस्थेला शिक्षणाच्या माध्यमातून शाश्वत विकासात योगदान दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय सूचना केंद्राने (एनआयसी) विकसित केलेल्या ‘सर्व्हिसेस प्लस’ या डिजिटल प्लॅटफॉर्मला देखील यशराज भारती सन्मान प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जी – २० चे शेरपा अमिताभ कांत, यशराज रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा दीपाली भानुशाली, माजी सनदी अधिकारी व लोकपाल सदस्य डी के जैन, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, यशराज रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त सुभाष मुंदडा, यशराज भारती सम्मान निवड समितीचे अध्यक्ष प्रा. राम चरण, आदी उपस्थित होते.

चित्रपताका महोत्सवाला दुसऱ्या दिवशी उदंड प्रतिसाद

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube