Money Market Timing Change On 22 January : येत्या 22 तारखेला अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहेत. हा दिवस दिवाळीसारखा साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशवासियांना केले आहे. दरम्यान, या दिवशी केंद्र सरकारने अर्धा दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, या दिवशी शेअर बाजार (stock market) उघडणार की नाही? असा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावत आहे. अशातच आता भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याबाबतची अपडेट दिली आहे.
Loksabha Election 2024 : ईशान्य मुंबईत पुन्हा संजय पाटील-मनोज कोटक भिडणार?
आरबीआयने आज (दि. 19 जानेवारीला) शेअर बाजारातील व्यापार नियमांबाबत मोठी घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, 22 जानेवारी 2024 रोजी व्यापाराच्या वेळा बदलण्यात आल्या असून या दिवशी बाजार अर्धा दिवस बंद राहील. या दिवशीचे सत्र दुपारी अडीच वाजता सुरू होऊन सायंकाळी पाच वाजता संपेल. आरबीआयने गुरुवारी १९ जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली आहे.
या बदलाचे कारण स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही, परंतु राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यामुळे केंद्र सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केलीये. कदाचित अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा ताळमेळ साधण्यासा आरबीआयनेही बाजाराच्या वेळेत बदल केला असण्याची शक्यता आहे.
पुणे लोकसभा : फडणविसांनी कोणाकोणाला शब्द दिलेत….
शेअर बाजार शनिवारी सुरू
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने सांगितले की, शेअर बाजाराचे कामकाज शनिवार (20 जानेवारीला) सुरू राहणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने हे विशेष सत्र रिकव्हरी साइटवर इंट्राडे स्विच-ओव्हरसाठी ठेवले आहे. उद्या दोन लहान सत्रांमध्ये दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर व्यापार करता येणार आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 2 विशेष सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. पहिले थेट सत्र सकाळी 9.15 वाजता सुरू होईल. पहिले सत्र 45 मिनिटांचे असून सकाळी 10 वाजता संपेल. तर दुसरे सत्र सकाळी 11.30 वाजता सुरू होईल. सत्र 1 तासाचे असेल, जे दुपारी 12.30 वाजता संपेल. तसेच प्री क्लोजिंग सत्र दुपारी 12.40 ते 12.50 पर्यंत असेल.