शेअर बाजारात तिसऱ्या दिवशीही मोठी घसरण, गुंतवणूकदारांना तब्बल एक लाख कोटींचा फटका

शेअर बाजारात तिसऱ्या दिवशीही मोठी घसरण, गुंतवणूकदारांना तब्बल एक लाख कोटींचा फटका

मुंबई : भारतीय शेअर बाजार (गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. आज सेन्सेक्स 542 अंकांनी घसरला. तर निफ्टी 19,400 च्या खाली आली. तथापि, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये काही प्रमाणात खरेदी झाली, ज्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला. फार्मा आणि युटिलिटी क्षेत्र वगळता इतर सर्व शेअर निर्देशांक घसरले. जागतिक बाजारातील संकेतामुळं रियल्टी, बँकिंग आणि मेटल यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. (stock market fell on the third day investors were hit by nearly one lakh crores)

व्यवहाराचा शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वरील 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 542.10 अंकांनी घसरला आणि 65,240.68 वर बंद झाला. तर दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 144.90 अंकांनी घसरून 19,381.65 वर बंद झाला

गुंतवणूकदारांचे 1.01 लाख कोटींच नुकसान
आज BSE वर सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांचे एकूण बाजार 302.32 लाख कोटी रुपयांवर आले. जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच बुधवारी 303.33 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.01 लाख कोटी रुपयांनी घटले. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.01 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

‘या’ शेअर्समध्ये तेजी
यामध्येही इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 0.60% वाढ झाली. याशिवाय एनटीपीसी, सन फार्मा (सन फार्मा), कोटक महिंद्रा बँक आणि जेएसडब्ल्यू स्टील यांच्या शेअअर्संनी आज वेग घेतला आणि ते सुमारे 0.05% ते 0.43% वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक घसरलेले शेअर्स
दुसरीकडे, सेन्सेक्समधील उर्वरित 24 शेअर्स आज मोठ्या घसरणीसह बंद झाले. यामध्येही टायटनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.40% घसरण झाली. यानंतर बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया आणि अल्ट्राटेक सिमेंट सर्वात जास्त घसरले आणि जवळपास 1.78% ते 2.29% पर्यंत घसरले.

1,793 शेअर्स वधारले
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) मध्ये आज मोठ्या प्रमाणात शेअर्स वाढीसह बंद झाले. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,715 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,793 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी, 1,768 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 154 शेअर्स कोणत्याही चढ-उताराशिवाय फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 174 शेअर्संनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 33 शेअर्संनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकाला स्पर्श केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube